पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताविरोधात रान पेटवण्यास पुन्हा सुरुवात केल्याचे दिसते. ते भारताविरोधात सतत भडकाऊ विधानं करत असतातच मात्र आता सत्ता गेलेले इम्रान खान अधिक धारदार बोलू लागले आहेत. भारत पाकिस्तानचे ३ तुकडे करेल, असे गंभीर विधान त्यांनी केले आहे. ज्यामुळे ते जगात चर्चेचा विषय बनलेत. (pakistan, india, imran khan, prime minister, military)
एका मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानने वेळेवर योग्य निर्णय घेतला नाही तर भारत पाकिस्तानचे ३ तुकडे करेल. भारताच्या परदेशातील थिंक टँकची तशी योजना करत आहे. पाकिस्तानमध्ये सैन्यासमोर दिवाळखोरी हे सर्वात मोठे संकट आहे. मी लिहून सांगतो, त्यामुळे पाकिस्तान संपेल, बर्बाद होईल तेव्हा जग अण्वस्त्र बंदी करेल.
इम्रान खान हे पंतप्रधान पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्यापासून पाकिस्तानात फिरून सारक्या सभा घेत आहेत. एका मागे एक सभांचा त्यांनी सपाटा लावला आहे. त्यासाठी त्यांना दुबईहून एक हॅलीकॉप्टर पाठवले गेले आहे. पण ते हॅलीकॉप्टर कोणी दिले? याचा खुलासा होऊ शकला नाही.
पाकिस्तान आत्महत्येच्या वाटेवर आहे. पाकिस्तानने योग्य निर्णय घेतले नाही तर सर्वात पहिली शिकार सैन्य असतील. त्यानंतर आपली अण्वस्त्रे जातील. जसे युक्रेनसोबत झाले तेच पाकिस्तानसोबत होईल. युक्रेनमध्ये १९९० ला जी परिस्थिती झाली होती. ती पाकिस्तानवर येईल, अशी भीती इम्रान खान यांनी व्यक्त केली.
परदेशातील भारतीय थिंक टँक स्वतंत्र बलुचिस्तान निर्माण करण्याची तयारी केली आहे. त्यांच्या तशा योजनाच आहेत. यामुळे मी दबाव आणत आहे, असं इम्रान खान म्हणाले. भारताच्या विरोधात असा आरोप करण्याची इम्रान यांची ही पहिलीच वेळ नाही. ते कायम अशा प्रकारे बोलत असतात, नवे पंतप्रधान शहाबाज शरिफ हे अमेरिकेला खूश करण्यासाठी काहीही करतील, असे म्हणत इम्रान यांनी त्यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
इम्रान खान पंतप्रधान पदावर असताना त्यांचे चीनसोबत जवळचे संबंध होते त्यामुळे ते नव्या सरकारला अमेरिकाधार्जिणी सरकार म्हणत त्यांच्यावर अरोप करत आहेत. तसेच अमेरिका आणि चीन यांमधले वैर जगापासून लपून नाही. पाकिस्तान चीनसोबत मोठे करार करून भारतासमोर आपण मजबुत असल्याचे दाखवत होते. चीन मात्र अमेरिका, भारतावर पाकिस्तानच्या आडून हल्ले करण्याचे काम करत होते. हे चित्र इम्रान खान सरकार गेल्याने बदलले. त्यामुळे सत्ता गेलेले इम्रान खान अस्वस्थ झाल्याचे दिसते.
महत्वाच्या बातम्या
“जम्मू-काश्मीरमधील आजची परिस्थिती ही १९९० पेक्षाही भयानक”, स्थानिकांनी सांगितला धक्कादायक अनुभव
एकनिष्ठ कार्यकर्ता! आपल्या नेत्याला विधानपरिषदेसाठी संधी मिळावी म्हणून लिहिलं रक्ताने पत्र; राज्यात चर्चा
नालंदातील ‘या’ गावात हिंदू लोक पढतात दिवसातून 5 वेळा अजान, कारण वाचून आश्चर्य वाटेल