मागील अनेक वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने प्रेक्षकांना खूप हसवले आहे. बऱ्याच दिवसांपासून ही मालिका सोनी टीव्हीवर सुरु आहे. या मालिकेतील कलाकार ही जग प्रसिद्ध कलाकार आहे. या कलाकारांना पात्राच्या नावानेच ओळखले जाते. तसेच या मालिकेने प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन केले आहे. अनेक वर्षांपासून ही मालिका लोकप्रिय मालिका आहे.
या मालिकेतील प्रत्येक पात्र लोकांना खूप आवडते. अनेक कलाकारांना पाहण्यासाठी लोक दिवाणे झाले आहेत. तसेच बालकलाकारांनी देखील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहेत. मात्र काही कलाकारांनी कालांतराने ही मालिका सोडली. तरी देखील त्यांची लोकप्रियता कमी झाली नाही. आजही ते त्यांच्या भूमिकेमुळे ओळखले जातात.
या मालिकेतील चंपक चाचा, जेठालाल, दयाबेन, तारक मेहता, अंजली भाभी, बबिता जी असे अनेक पात्रं प्रसिद्ध आहेत. मात्र यामधील असे काही कलाकार आहे जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचं आवडतात. ते म्हणजे मालिकेचं अविभाज्य घटक टप्पू सेना. टप्पू, गोगी, पिंकू, गोली, सोनू यांची मिळून टप्पू सेना आहे.
मात्र आतापर्यंत सोनू दोन वेळा बदलली आहे. पहिल्या सोनूचे नाव झील मेहता तर दुसऱ्या सोनूचे नाव निधी भानुशाली असे होते. जेव्हा निधी भानुशालीने ही मालिका सोडली होती, तेव्हा तिच्याबद्दल अनेक बातम्या समोर आल्या होत्या. मात्र आता झील मेहता मालिका सोडल्यानंतर सध्या काय करतेय, याबाबत माहिती समोर आली आहे.
जेव्हा झील जेव्हा सोनूची भूमिका साकारत होती, तेव्हा तिला खूप लोकप्रियता मिळाली होती. एक बालकलाकार म्हणून तिने आपलं वेगळे स्थान निर्माण केले होते. सर्वांनाच असा प्रश्न पडला असेल की, सध्या झील मेहता काय करत असेल. तर नुकतेच तिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट होत आहेत.
तर झीलची ही पोस्ट पाहून सर्वांनाचं समजेल की, ती सध्या काय करत आहे. तिने एक मेकअप आर्टिस्ट म्हणून काम सुरू केल्याचे दिसत आहे. इतकेच नव्हे तर, तिची आई देखील एक मेकअप आर्टिस्ट आहे. याच्या व्यतिरिक्त झील एका खाजगी ई-कॉमर्स कंपनीत सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत आहे.
झीलच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’या मालिकेत चार वर्षे काम केले. त्यानंतर तिने या मालिकेचा निरोप घेतला. मात्र त्यामागे कारण देखील तसेच होते. कारण म्हणजे त्या दिवसांत झील दहावीला होती. तेव्हा दहावीच्या परीक्षा सुरु होणार होत्या आणि मालिकेमुळे अभ्यास करणे सोपे नव्हते म्हणून तिने मालिका पडण्याचा निर्णय घेतला.