Yuzvendra Chahal: युझवेंद्र आणि धनश्रीचा वाद ज्या पार्टीपासून सुरू झाला ती पार्टी कोणी दिली? अखेर झाला खुलासा

युझवेन्द्र चहल (Yuzvendra Chahal): युझवेन्द्र चहल व त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरु असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर दिसत आहे. धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइल वरून चहल हे नाव काढून टाकले आहे. त्यामुळे या दोघात काहीतरी वाद झाला असावा असा अंदाज वर्तवला जात होता. त्याचबरोबर युझवेन्द्रने सुद्धा ‘नवीन आयुष्य लोड होत आहे’ अशी पोस्ट केली होती.

या दोन्ही घटना जोडत सोशल मीडियावर त्यांच्यातील वादाविषयी चर्चा चालू आहेत. अशातच धनश्रीने एक पोस्ट सोशल मीडियावर टाकली आणि त्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. या दोघांमध्ये वाद सुरु असल्याची भनक चाहत्यांना लागली. धनश्रीने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “एक राजकुमारी नेहमीच तिच्या वेदनांचे शक्तीमध्ये रूपांतर करेल.” या पोस्टला चहलनेही लाइक केले आहे.

लॉकडाऊन काळात धनश्रीने ऑनलाईन डान्स क्लास सुरु केले होते. त्यामध्ये युझवेन्द्रने प्रवेश घेतला होता. त्याच तीन महिन्यात यांना एकमेकांवर प्रेम झालं.
२२ डिसेंबर २०२० मध्ये त्यांनी धुमधडाक्यात लग्न केले. लग्नाचे व इतरही अनेक रोमँटिक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेयर केले आहेत. सर्व व्यवस्थित असताना अचानक त्यांच्यातील वाद समोर आला.

त्यांच्यातील हा वाद एका डिनर पार्टीपासून सुरु झाला होता. ती पार्टी भारताच्याच एका क्रिकेटपटूने दिली होती. त्या पार्टीत एका क्रिकेटपटू सोबत असलेले तिचे काही फोटो व्हायरल झाले होते. तेव्हापासून यांच्यात वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. ज्या क्रिकेटपटूसोबत धनश्रीचे फोटो व्हायरल झाले तो श्रेयस अय्यर असल्याचेही समजले आहे.

धनश्री श्रेयस सोबत डेटींग करत असल्याचेही ऐकायला मिळत आहे. त्यांचे अनेक फोटो व्हायरल होत आहे. ज्या पार्टीतील फोटोमुळे वाद निर्माण झाला ती पार्टी भारताचा धडाकेबाज खेळाडू सूर्यकुमार यादवने दिलेली होती, असे समजले आहे. चहल आणि धनश्री यांनी घटस्फोट घेतला याबाबतची बातमीसुद्धा व्हायरल झाली होती.

घटस्फोटाबाबतचे ट्विट ANI या वृत्तसंस्थेच्या नावाने केले होते. अशी कोणतीही बातमी आम्ही दिलेली नाही, ते ट्विट फेक अकाऊंटवरून करण्यात आल्याचे ANI ने स्पष्ट केले आहे. धनश्री आणि युझवेन्द्रच्या बाबतीत सोशल मीडियावर अनेक चर्चा केल्या जात आहेत.

महत्वाच्या बातम्या
Zarkhand : पोलिसांची वर्दी घालून ट्रकचालकांना लुबाडणाऱ्या अभिनेत्रीचा पर्दाफाश, ‘असा’ रचला होता प्लॅन 
Sonali Phogat: मृत्युच्या काही तासांपुर्वीच सोनाली फोगाटने शेअर केला होता ‘हा’ व्हिडीओ, तिला यातून काय दाखवायचे होते?
Scorpions Poison: विंचवाच्या १ लिटर विषासाठी मोजावे लागतात तब्बल ८० कोटी, पण हे विष कोठे वापरतात?
आदित्य ठाकरेंच्या सभांना तुफान प्रतिसाद; विरोधकांना फुटला घाम, राजकीय समीकरण बदलणार