बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाने आपले स्थान निर्माण केले. तसेच अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी कमी चित्रपटात काम करून ही आपली ओळख निर्माण केली आहे. यामध्ये अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. मात्र अशी एक अभिनेत्री आहे जिने साऊथ चित्रपटातून पदार्पण केले आहे. इतकेच नव्हे तर तिने बॉलिवूडमध्ये ही मोजक्याच चित्रपटात काम केले आहे.
ती अभिनेत्री म्हणजे हेजल कीच. हेजलने खूप कमी काही चित्रपटात काम केले आहे. परंतु तिला आपली ओळख निर्माण करण्यात यश मिळवले. तसेच तिने साऊथच्या ‘बिल्ला’ या चित्रपटातून अभिनय कारकीर्दीत पदार्पण केले. त्याचबरोबर तिने सुपरस्टार सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटातही सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केले आहे. या चित्रपटात हेजलने अभिनेत्री करीना कपूरच्या बेस्ट फ्रेंडच्या भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचे खूप कौतुकही झाले होते.
महत्वाचे म्हणजे हेजलचे खरे नाव गुरबसंत कौर असे आहे. खरंतर तिचे वडील ब्रिटीश होते. तर आई ही भारतीय वंशाची होती. आज म्हणजे २८ फेब्रुवारी रोजी हेजलचा वाढदिवस आहे. ती आज आपला ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. आज वाढदिवसानिमित्त तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत.
आपल्या सर्वांना माहितीच आहे की, क्रिकेटपटू युवराज सिंह आणि हेजल कीचने साल २०१६ मध्ये लग्न केले. मात्र लग्नाच्या अगोदर अनेक वर्षांपासून हे दोघेही रिलेशनशिप होते. खरंतर यांची लव्ह स्टोरी ही इतकी साधी सरळ अजिबात नाही. युवराजला हेजलला प्रपोज करण्यासाठी जवळजवळ तीन वर्षे लागले. खरंतर युवराजला हेजलसोबत डेटवर जायचे होते. पण तिच्या एका सवयीने तो खूप वैतागला होता.
इतकेच नव्हे तर त्याने तिच्यावर नाराज होऊन तिचा नंबर ही डिलीट केला होता. माध्यमांच्या माहितीनुसार, युवराजने हेजलला अनेक वेळा कॉफी डेटसाठी विचारले होते. डेटसाठी ती नेहमी हो म्हणत होती. परंतु त्यानंतर हेजल जे काही करायची, ते युवराजला अजिबात आवडत नव्हते.
कॉफी डेटसाठी हेजल नेहमी युवराजला हो म्हणायची. आणि नंतर तिचा फोन स्विच ऑफ करून ठेवायची. तिच्या या वागण्यामुळे युवराजला खूप चीड यायची. याच रागात त्याने हेजलचा नंबर डिलीट करून टाकला. इतकेच नव्हे तर, युवराजने स्वतः हेजलला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. जी हेजलने अनेक दिवस स्वीकारली नव्हती. तिने जवळजवळ तीन वर्षांनी युवराजची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली.
यानंतर युवराज आणि हेजलमध्ये मैत्री झाली. खरंतर हेजल आणि युवराजची भेट एका कॉमन फ्रेंडमुळे झाली होती. त्यानंतर अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या दोघांनी बालीमध्ये साखरपुडा केला. ज्यामध्ये फार कमी लोक उपस्थित होते. त्यानंतर २०१६ मध्ये दोघांनी लग्न केले. सध्या हे दोघे एकमेकांसोबत खूप आनंदी आहेत. त्याचबरोबर जानेवारी २०२२ मध्ये हेजलने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही आनंदाची बातमी युवराज आणि हेजलने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.