Share

पिंपरीत तरुणाला जमिनीवरची बिस्किटे खायला लावणाऱ्या ‘भाईंची’ पोलिसांनी जिरवली; मुंडन करून काढली धिंड

pimpari

काही दिवसांपूर्वीच पिंपरी भागात एक धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले होते. भाई न म्हणाल्याच्या कारणावरून तरुणाला जमिनीवरची बिस्कीटे खायला लावल्याचा किळसवाना प्रकार घडला होता. या घटनेचा परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. तसेच या प्रकरणी तरूणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. (youth shaved off criminals who were feeding him biscuits on the ground)

या प्रकरणी आता पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. तरुणाला जमिनीवरची बिस्किटे खायला लावणाऱ्या ‘भाईंची’ पोलिसांनी चांगलीच जिरवली आहे. याप्रकरणातील ‘भाई’ दोन साथीदार आरोपींना अटक करून वाकड पोलिसांनी त्यांचे मुंडन करून रविवारी त्यांची गणेशनगर परिसरातून धिंड काढली.

अजित उर्फ आदित्य सुनील काटे (वय २०, रा. ताथवडे), प्रकाश भिवा इंगोले (वय २१, रा. काळाखडक, वाकड), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह गंग्या उर्फ रोहन वाघमारे (रा. थेरगाव), प्रशांत आठवले (रा. शिवकाॅलनी, गणेशनगर, थेरगाव), व तीन अल्पवयीन मुले यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील अल्पवयीन तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी २० वर्षीय तरूणाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. थेरगाव येथील गणेशनगर येथे मंगळवारी (दि. २५) रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला होता.

त्याच झालं असं, आरोपी रोहन याने फिर्यादी तरूणाला मोबाईलवर कॉल करून शिवीगाळ केली. तरूणाने रोहनला तू मला फोनवर शिवीगाळ का केली, अशी विचारणा केली. याचा राग आल्याने तू मला रोहन का म्हणालास, मला भाई का नाही म्हणाला, मी या एरियाचा भाई आहे, असे म्हणत रोहनने तरूणाला शिवीगाळ केली.

त्यानंतर रोहनने त्याला भेटण्यास बोलविले. त्यानुसार, तरूण मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास रोहनला भेटायला गेला. त्यावेळी भाई न म्हणाल्याच्या कारणावरून रोहनसह त्याच्या चार साथीदारांनी तरूणाला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. जमिनीवर बिस्किटे टाकुन ती खाण्यास भाग पाडली.

दरम्यान, यामध्ये तो जखमी झाला. सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून ‘भाई’ दोन साथीदार आरोपींना अटक करून वाकड पोलिसांनी त्यांचे मुंडन करून रविवारी त्यांची गणेशनगर परिसरातून धिंड काढली.

महत्त्वाच्या बातम्या
२ मुलांचा बाप आणि ४७ वर्षीय वय असलेल्या ‘या’ अभिनेत्यावर फिदा आहे पुष्पामधील श्रीवल्ली, वाचून अवाक व्हाल
भारताच्या स्वयंपाक घरात वर्षानुवर्षे राज्य करणारा ‘डालडा ब्रँड’ आता संपुष्टात का आला? वाचा कहाणी
बापाच्या नावाला काळीमा! पोटच्या मुलीला विवस्त्र करून केली मारहाण, कारण वाचून धक्का बसेल
‘व्हॅलेंटाईन डे’ च्या तीन दिवस आधीच पृथ्वीचा होणार विनाश? नासाच्या तज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

ताज्या बातम्या इतर क्राईम

Join WhatsApp

Join Now