सख्खे जुळे भाऊ अनेकदा तुम्ही पाहिले असतील. काही जुळे भाव तर अगदी सेम दिसतात. एवढच काय तर, हालचाली देखील त्यांच्या सेमच असतात. जुळे पोरं घरात असली की अनेकदा गमती जमती घडतात. मात्र आता आम्ही तुम्हाला एक धक्कादायक प्रकार सांगणार आहोत.
जुळे असल्याचा घेतला गैरफायदा घेत भावाच्याच पत्नीवर दोघांनी अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी पती, दीर, सासू आणि सासऱ्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा नेमकं घडलं काय..? ही धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील असल्याच उघडकीस आली आहे. सहा महिन्यांपूर्वी दोन जुळ्या भावातील एकाचे लग्न झाले होते. या दोन्ही जुळ्या भावांमध्ये साम्य होते. धक्कादायक बाब म्हणजे यामुळे घरातील नवविवाहित मुलीला नवरा आणि दीर यातील फरकच लक्षात आला नाही.
यातूनच हा धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे जुळे असल्याचा फायदा घेत दिराने आपल्या भावजयीवर सहा महीने अत्याचार केला. सहा महिन्यांनी पीडितेच्या लक्षात हा सर्व प्रकार आला. या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, पीडितेने माहेरच्या लोकांना हा संपूर्ण प्रकार सांगितला. मुलीने संपूर्ण प्रकार आपल्या आई – वडिलांना सांगितला असता त्यांच्या पाया खालची जमीनच सरकली. काही दिवसांनी तिचा जुळा दीर घ्यायला गेला. मात्र तिने सासरी जाण्यास स्पष्ट नकार दिला.
अखेर पीडितीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. याप्रकरणी पती, दीर, सासू आणि सासऱ्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी पीडितेचा पती आणि दिराला अटक केली आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
भाजप मनसे युतीचा राज्यातील पहीला विजय; १३ पैकी ११ जागा जिंकत केला राष्ट्रवादीचा सुपडा साफ
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द होण्यासाठी महाराष्ट्रातून पवारांनी रसद पुरवली? मनसे नेत्याने शेअर केला ‘तो’ फोटो
पुन्हा ‘तो’ येतोय! राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केले मोठे विधान
मोठा खुलासा! मुंबईच्या विजयाचा हिरो टीम डेव्हिडला RCB ने सामन्याआधी पाठवला होता ‘हा’ मेसेज