गुजरातमधील अभयम हेल्पलाइन (Abhayam Helpline) समुपदेशकांना अलीकडेच एक गुंतागुंतीचच्या प्रकरणाला समोरे जावे लागले, ज्यात मणिनगरमधील एका महिलेने आरोप केला की तिच्या मोठ्या बहिणीने तिचे विवाहबाह्य संबंध लपवण्यासाठी तिच्या नवऱ्याच्या भावाशी लग्न लावून दिले. या प्रकरणाच्या तपशिलात गेल्यावर असे आढळून आले की, मोठ्या बहिणीने आपल्या पतीच्या भावासोबत असलेले विवाहबाह्य संबंध लपवायचे असल्याने तिच्या धाकट्या बहिणीचे तिच्या दिराशी लग्न लावून दिले.(Younger sister forced to marry him to hide immorality)
अभयम हेल्पलाइन समुपदेशकांनी सांगितले की, त्यांना एका 23 वर्षीय महिलेचा फोन आला, जिने त्यांना सांगितले की, तिच्या सासरच्या मंडळींकडून तसेच तिच्या बहिणीकडून तिचा छळ होत आहे. समुपदेशकांच्या म्हणण्यानुसार, महिलेने त्यांना सांगितले की, तिच्या बहिणीचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तक्रारदार महिलेला तिच्या नवऱ्याचे तिच्या मोठ्या बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचे लग्नानंतर लगेचच समजले. दोघेही नात्याने वहिनी आणि दिर लागतात.
तक्रारदार महिलेने अभयमच्या समुपदेशकांना सांगितले की तिने या प्रकरणाची संपूर्ण माहिती तिच्या बहिणीच्या पतीला म्हणजेच तिच्या दाजींना दिली होती, परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर तिने अभयम हेल्पलाइनवर फोन केला. महिलेने अभयम हेल्पलाइनच्या समुपदेशकाला सांगितले की, लग्नानंतरही तिचे पतीसोबत कोणतेही संबंध नाहीत.
नंतर, तक्रारदार महिलेच्या पतीने आणि तिच्या बहिणीने कबूल केले की, दोघांमधील संबंध उघड होऊ नयेत आणि ही बाब घरातच लपवून ठेवण्यासाठी लग्नाचे नियोजन केले होते. मात्र, वाहिनी आणि दिरातील विवाहबाह्य संबंध संपुष्टात येतील आणि तक्रारदार महिलेला यापुढे कोणताही त्रास होणार नाही, अशी ग्वाही कुटुंबीयांनी अभयम समुपदेशकांना दिली आहे.
2014 मध्ये, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, गुजरात सरकारने महिलांसाठी ‘अभयम हेल्पलाइन 181’ सुरू केली होती. कोणतीही महिला 181 अभ्यम हेल्पलाइनचा वापर कौटुंबिक हिंसाचारासह विविध परिस्थितींमध्ये समुपदेशन, मार्गदर्शन, माहिती आणि बचावासाठी करू शकते. सध्या अहमदाबाद आणि सुरत शहरात 181 अभयम हेल्पलाइन कार्यरत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
लग्नाचे खरे वचन दिल्यानंतर केलेले शारिरीक संबंध म्हणजे बलात्कार नाही, हायकोर्टाने दिला महत्वपुर्ण निर्णय
मंदानाने उघड केले मोठे रहस्य, म्हणाली, माझ्या पतीचे अनेक महिलांसोबत शारिरीक संबंध होते
मी ज्यांना ओळखत होते त्या सगळ्यांसोबत माझ्या पतीचे शारिरीक संबंध होते, अभिनेत्रीचा मोठा खुलासा
पत्नीला परपुरुषांसोबत संबंध ठेवण्यास पाडायचा भाग; पोलिसांना पतीनं सांगितलं धक्कादायक कारण