Share

eknath shinde : “मुख्यमंत्री साहेब माझ्या बापाला वाचवा”, लेकीचं मुख्यमंत्र्यांना काळजाचा ठोका चुकवणार पत्र, वाचा नेमकं काय पत्रात?

eknath shinde

eknath shinde : एकीकडे राज्यातली राजकारण तापलं आहे तर दुसरीकडे राज्यातील आत्महत्यांचे प्रमाण देखील वाढलेलं दिसतं आहे. दुष्काळ, सावकारकडून होणारी पिळवणूक, नैसर्गिक संकट, कर्ज अशा अनेक कारणांमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आमहत्या हा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळतं आहे.

एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गे राज्याच्या राजकरणात सक्रिय झाले आहेत. तर दुसरीकडे बीडच्या एका विवाहित तरुणीने थेट मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहून कष्टकरी बापाची झालेली पिळवणूकीची हकीकत सांगितली आहे. सध्या हे पत्र सोशल मिडियावर व्हायरल होतं आहे.

“मुख्यमंत्री साहेब माझ्या बापाला वाचवा”, अशी विनंती या तरुणीने आपल्या पत्रातून मुख्यमंत्री शिंदे यांना केली आहे. पुजा शेखर सावंत असं या 24 वर्षीय तरुणीचे नाव आहे. पैसे परत करून देखील सावकार जमीन घेत असल्याचं या तरुणीने पत्रात म्हंटलं आहे. यामुळेच वडील आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याच देखील तिने म्हंटलं आहे.

‘लाडक्या लेकीच कल्याण होतंय म्हणून बापाने सावकाराकडून साडे 8 लाख रुपये 4 टक्क्याने घेतले. सावकारला 32 लाखाच्या जमिनिचे तात्पुरते खरेदीखत करुन दिले. त्यानंतर व्याजाचे पैसे परत केले मात्र तरी देखील सावकार जमीन देतं नसल्याचं तरुणीने म्हंटलं आहे.

दरम्यान, आता यावर मुख्यमंत्री शिंदे काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या पूजाचं हे पत्र सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. यावर अद्याप मुख्यमंत्री शिंदे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. मात्र सर्वांचे लक्ष्य शिंदे यांच्या भूमिकेकडे लागलं आहे.

वाचा काय आहे पत्रात..?
तरुणीने आपल्या पत्रात म्हंटलं आहे की, “गावातील खासगी सावकारनेच स्थळ आणले. अन् मी देतो पैसे करा लग्न. वडिल म्हणाले. मुलगा चांगला आहे. तर पैसे ठीक आहे. सावकाराने आम्हाला 8 लाख 50 हजार दिले. लग्न काही दिवसांवर आलं. सावकराने पैसे चार रुपये टक्क्याने राहुद्या तोपर्यंत मला दोन एक्कर जमिन नावची करुन द्या. लग्न जवळ आल्याने आमच्या समोर कोणताही पर्याय नव्हता.

त्यानंतर आम्ही 2 एक्कर जमीनीचे खरेदी खत तात्पुरते करुन दिले. नंतर माझे लग्न लावून दिलं. लग्न झाल्यानंतर त्यांनी मला 10 दिवसात हाकलून दिले. वडिलांनी सावकाराचे पैसे परत करुनही जमिन परत दिली नाही. माझे लग्न लावून दिले. तरी मी घरीच आहे. आता माझे वडिल खूप खचले असून त्यांनी 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे,” या तरुणीने पत्रात म्हणलं आहे.

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now