Share

दुचाकीने परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थिनीसोबत घडलं विपरीत; मैत्रिणीच्या डोळ्यादेखत चिरला गळा

Chinese manja

चायनीज मांजाने अपघात झाल्याच्या अनेक घटना आपण नेहमी वाचत असतो. दरवर्षी अनेक नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी पर्यावरण व मानवजातीसाठी अत्यंत घातक ठरलेल्या चायनीज मांजाने हिंगोलीत एका पांढऱ्याशुभ्र बदकाचा जीव घेतला होता. (Young woman injured by Chinese manja in Yavatmal )

अनेक नागरिक व पक्षी या चायनीज मांजाने जखमी होतात. अशीच एक धक्कादायक घटना यवतमाळ मध्ये घडली आहे. चायनीज मांजाने यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील तनुश्री विलास पारखीला जखमी केले आहे. सकाळी आठच्या सुमारात तनुश्री एका मैत्रिणीला घेऊन शाळेत सराव परीक्षेसाठी जात होती.

परीक्षेसाठी जाताना आवारी लेआऊटमधील मनोहर मुके यांच्या घराजवळ अचानक पतंगीचा मांजा तनुश्रीच्या गळ्यात लटकला. चायनीज मांजा असल्यानं तिचा गळा कापला गेला. यात तनुश्री जबर जखमी झाली. सध्या सुगम हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे तनुश्रीच्या गळ्याला दहा टाके मारण्यात आले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुण्यात दुचाकीवरुन नातेवाईकांकडे जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्याभोवती मांजा अडकल्याने महिलेचा गळा कापला होता. सुदैवाने महिलेवर तत्काळ उपचार झाल्याने महिलेचा जीव वाचला, मात्र या प्रकारामुळे महिलेस मोठ्या प्रमाणात मानसिक धक्का बसला होता.

तसेच यापुर्वी पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये मांजाने गळा कापल्याने दोन युवतींना आपले प्राण गमवावे लागले होते. तसेच दरवर्षी अनेक नागरीक व पक्षी मांजामुळे गंभीररीत्या जखमी होत आहेत. या चायनीज मांजावर शहरात बंदी आहे. तरीही शहरात मोठ्या प्रमाणात चायनीज मांजाची विक्री होत आहे, याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

जाणून घ्या चायनीज मांजा कशापासून तयार करण्यात येतो. चायनीज मांजा याला प्लास्टिक मांजा असेही म्हणतात. चायनीज मांजा हा इतर मांजासारखा धाग्याने बनवला जात नाही. हा नायलॉन आणि धातूची पावडर मिसळून तयार केला जातो. हे प्लास्टिकसारखे वाटते आणि ताणण्यायोग्य आहे.

अशा परिस्थितीत जेव्हा ते खेचले जाते तेव्हा ते तुटण्याऐवजी वाढते. तो मांजा ब्लेडसारखा धारदार असून त्याच्या विक्रीवर बंदी आहे, मात्र बंदी असतानाही त्याची खुलेआम खरेदी-विक्री सुरू आहे. अनेकांनी चायनीज मांजाने आपला जीव गमावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
दक्षिण मुंबईतुन १३ मिनीटांत नवी मुंबई एअरपोर्टला जाता येणार; गडकरींनी सांगितली भन्नाट ट्रिक
माझ्यावरील हल्ला मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच, पंतप्रधानांकडे तक्रार करणार – किरीट सोमय्या
हिंदुस्तानी भाऊची जामीनावर सुटका ? हिंदुस्थानी भाऊचे वकिलांनी दिली महत्त्वाची माहिती…
लिंग बदलून आयुष्मान बनला झोया; प्रियकरानेच काच भोकसून केली हत्या, गुन्हा दाखल

इतर राज्य

Join WhatsApp

Join Now