Share

एकुलत्या एक मुलीचा गिझर मधून गॅस गळती झाल्याने मृत्यू; आईने फोडला हंबरडा

sakshi jadhav

अनेक ठिकाणी गिझर मधून गॅस गळती झाल्याच्या घटना घडतात. यामध्ये अनेकांना आपला जीव देखील गमववा लागला आहे. अशीच एक धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. या घटनेत एका तरुणीने आपला जीव गमवला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Young woman dies in bathroom after gas leak from geyser)

ही घटना नाशिकच्या जेल रोड परिसरात घडली आहे. साक्षी अनिल जाधव असे या मृत तरुणीचे नाव आहे. साक्षी ही तिच्या आई – वडिलांची एकुलती एक मुलगी होती. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक मधील आरंभ महाविद्यालयात ती एमएचं शिक्षण घेत होती. आणि सध्या ती तिच्या कुटुंबियांसोबत जेल रोड येथील श्री संकुल अपार्टमेंट येथे राहत होती.

अवघ्या 22 वर्षाच्या साक्षीने शनिवारी जगाचा निरोप घेतला. नेहमीप्रमाणे शनिवारी साक्षी अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली होती. मात्र बाथरूममधील गिझर च्या गॅसची गळती झाल्याने बाथरूम मध्ये सर्वत्र गॅस पसरला होता. हे साक्षीच्या लक्षात न आल्यानं गॅस तिच्या नाका तोंडात गेला. यामुळे साक्षी बाथरूममध्ये बेशुद्ध पडली होती.

मात्र बराच वेळ झाला तरीही साक्षी बाहेर आली नाही म्हणून घरच्यांनी बाथरूमच्या दरवाजा तोडला असता साक्षी बाथरूम मध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली. तात्काळ कुटुंबीयांनी साक्षीला उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र खूप उशीर झाला होता, साक्षीने जगाचा निरोप घेतला होता. अखेर डॉक्टरांनी तिला मृत घोषित करण्यात आले.

अचानक साक्षीच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये अशीच एक घटना घडली होती. गॅस गिझर फुटल्याने एका युवकाचा गुदमरून मृत्यू झाल्याची धाक्कादायक घटना शहरातील सिडको परिसरात घडली होती. मृत युवकाचे नाव गौरव पाटील असे होते.

गौरव अंघोळ करत असताना हा प्रकार घडला होता. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच श्वास गुदमरल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. गौरव पाटील त्याच्या घरात बाथरुममध्ये अंघोळ करत होता. यावेळी अचानक गॅस गिझरचा स्फोट झाला. त्यानंतर गौरवला गुदमरायला लागले. मात्र, श्वास घेण्यास जास्तच त्रास जाणवू लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

महत्त्वाच्या बातम्या
एकुलत्या एक मुलीचा गिझर मधून गॅस गळती झाल्याने मृत्यू; आईने फोडला हंबरडा
माशाने केली मगरीसोबत मोठी खेळी, असा घेतला मगरीचा जीव की पाहून बसेल धक्का; पहा व्हिडीओ
मोठी बातमी! चिथावणीखोर हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकला ठोकल्या बेड्या
रानू मंडल पुन्हा आली भेटीला, गायलं कच्चा बादाम गाणं; सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय व्हिडिओ

इतर क्राईम ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now