या कार्यक्रमात बोलताना साध्वी सरस्वती यांनी हिंदू तरुणांना तलवार बाळण्याचं वादग्रस्त आवाहन केलं आहे. त्यांनी द कश्मीर फाईल्सच्या निमित्ताने केलेल्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत. चला पाहुयात काय म्हणाल्या साध्वी सरस्वती.. काय आहे वादग्रस्त विधान?
काल धुळ्यात रामनवमीचा उत्सव पार पडला. राम नवमीच्या उत्सवानिमित्त येथे धर्मसभेचे आयोजन केले होते. त्यात विश्व हिंदू परिषेदेच्या नेत्या साध्वी सरस्वती यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी स्वाध्वी सरस्वती यांनी धुळेकरांना संबोधित करताना वादग्रस्त विधान केले आहे.
स्वाध्वी सरस्वती यांनी द कश्मीर फाईल्सच्या निमित्ताने केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. शस्त्र ठेवणे तर आपल्या हिंदूंची शान आहे,” असे म्हणत साध्वी सरस्वती यांनी हिंदु तरुणांना तलवार हातात बाळगण्याचे आवाहन केले आहे.
“धुळ्यात देखील दुसऱ्या कश्मीर फाईलची पुनरावृत्ती ना होवो यासाठी एक लाख रुपयाचा मोबाईल, लॅपटॉप हातात बाळगणाऱ्यांनी एक हजार रुपयाची तलवार देखील हातात ठेवावी, असं शस्त्र ठेवणे तर आपल्या हिंदूंची शान आहे,” असे म्हणत साध्वी सरस्वती यांनी हिंदु तरुणांना तलवार हातात बाळगण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, पुढे बोलताना त्या म्हणल्या, ‘एक दिवस आपल्यालाही पळवले जाईल. तेव्हा आपल्यालाही विचारण्यात येईल की हिंदूंनी, ब्राम्हणांनी तलवार का नाही उचलली ? आपल्या हक्कासाठी लढाई का नाही केली? हीच वेळ आपल्यावर होऊ शकते. म्हणूनच मी विनंती करते की, तुमच्या धुळ्यातही अशी परिस्थिती उद्भवायला नको, म्हणूनच तलवारही खरेदी करा.’