Share

crime news : मोक्ष मिळविण्यासाठी साधूंनी तरुणाला समाधी घ्यायला लावली; खड्डा खणून जमिनीत जिवंत गाडलं अन्…, वाचून हादराल

crime news

crime news  : अजूनही काही भागात अंधश्रद्धेला खातं, पाणी घातलं जातं. अंधश्रद्धेतून अनेक धक्कादायक प्रकार देखील घडल्याचं उघडकीस आलं आहे. हे सांगण्याच कारण म्हणजे नुकतीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अवघ्या 22 वर्षीय तरुणाने समाधी घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी प्रसंगावधान दाखवल्याने या तरुणाचा जीव वाचला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ चार साधुंना अटक केली आहे. हा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला असल्याची माहिती समोर आली आहे.

वाचा नेमकं प्रकरण काय..?
हे प्रकरण उत्तर प्रदेशातील उन्नावमधील बांगरमाऊ परिसरातील ताजपूर गावात हा धक्कादायक प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, शुभम नावाच्या तरुणाचा कर्मकांडांवर प्रचंड विश्वास आहे. बांगरमऊचे क्षेत्राधिकारी (सीओ) पंकज कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधी घेतलीस तर सिद्धी प्राप्त होईल, असं पुजाऱ्यांनी शुभमला सांगितलं.

सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभमला नवरात्रीच्या एक दिवस आधी जमिनीत खड्डा खणून बसवण्यात आलं. त्यानंतर त्याच्यावर माती टाकण्यात आली. याची माहिती गामस्थांनी पोलिसांना दिली. तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण प्रकार पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली.

पोलिसांनी तातडीनं माती हटवली. शुभमला खड्ड्यातून बाहेर काढलं. तो जिवंत होता. घटनास्थळी असलेल्या चार साधूंना अटक करण्यात आली. तसेच या चार साधुंवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर शुभमने पोलिसांना जे सांगितलं ते ऐकून पोलिसही चक्रावले.

‘मोक्ष मिळवण्यासाठी नवरात्रीच्या एक दिवस आधी समाधी घेण्याचा संकल्प केल्याचं शुभमनं पोलिसांना सांगितलं. तर दुसरीकडे आम्ही त्याला समाधी घेण्यापासून रोखायचा प्रयत्न केला. मात्र त्यानं ऐकलं नाही. त्यामुळे खड्डा खणून त्याला त्यात झोपवण्यात आल्याची माहिती साधूंनी पोलिसांना दिली.

महत्वाच्या बातम्या
Deepika padukone : हृदविकाराच्या आजारामुळे दिपीकाची प्रकृती चिंताजनक; मध्यरात्री ॲडमीट, डॉक्टरांनी दिली मोठी अपडेट
Eknath Shinde : अखेर निर्णय झाला! एकनाथ शिंदे होणार नवे शिवसेना पक्षप्रमुख
Chhagan Bhujbal : शाळांमध्ये सरस्वती ऐवजी शाहु फुले आंबेडकारांचे फोटो लावा; छगन भुजबळांची जाहीर मागणी
Election Commission : शिवसेना नेमकी कोणाची? निवडणूक आयोगाने दिलं महत्वपूर्ण स्पष्टीकरण
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now