कौटुंबिक वादविवादाला कंटाळून आज दुपारी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात एका तरुणाने भरधाव एक्सप्रेससमोर उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्याला वाचविण्यासाठी पोलीस कर्मचारी देवासारखे धावून आल्याचे एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून समोर आले आहे. या घटनेचा सर्व प्रकार स्थानकाच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
एक्सप्रेस समोर उडी मारणाऱ्या या तरुणाचे नाव कुमार गुरुनाथ पुजारी असून तो फक्त १८ वर्षांचा आहे. आज दुपारी ३ च्या सुमारास जीव देण्यासाठी कुमार रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर येऊन थांबला होता. कल्याणहून कर्जतकडे जाणारी एक्सप्रेस भरधाव वेगाने येताना दिसताच कुमारने उडी मारली.
हा प्रसंग तीथे असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने पाहिल्यानंतर त्याने रेल्वे रुळावर जाऊन कुमारला बाजूला सारले. यावेळी पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या धाडसाचे कौतुक सर्वांनी केले. यानंतर कर्मचाऱ्यांने तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली.
समोर आलेल्या माहितीनुसार, कुमारला वाचविलेल्या कर्मचाऱ्याचे नाव ऋषिकेश चंद्रकांत माने असे आहे. माने यांनी केलेल्या धाडसाचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला अनेकांनी शेअर करत माने यांचे कौतुक केले आहे.
तणावाखाली आलेला एक व्यक्ती आज विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेखाली आला. मात्र मुंबई लोहमार्ग पोलिसांनी वेळीच तत्परता दाखवत त्याचे प्राण वाचवले. समुपदेशनानंतर तो त्याच्या कुटुंबियांकडे गेला.
आम्ही आवाहन करतो की तणावाच्या परिस्थितीत इतरांची मदत घ्या. जीव महत्त्वाचा आहे. pic.twitter.com/CA16sr9jKX
— GRP Mumbai (@grpmumbai) March 23, 2022
प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादामुळे कुमारने आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास कल्याण लोहमार्ग पोलीसांनी करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी एक्सप्रेससमोर उडी मारणाऱ्या अनेकांनी केला आहे. यामध्ये काहींनी आपले प्राण गमावले आहेत.
तर काहींना पोलीस अधिकाऱ्यांनीच वाचविले आहे. अशा घटना अनेकवेळा पोलिसांच्या जीवावर बेतल्या असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. परंतु तरी देखील कसलीच पर्वा न करता आपली जबाबदारी पार पाडण्यास पोलीस नेहमी आजवर सक्षम राहिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
अमोल कोल्हे म्हणतात, मैं थकेगा नहीं साला… हातात टायर अंगात फायर; पहा कोल्हेंचा फिटनेस व्हिडिओ
अमिताभ बच्चनसोबत होळी खेळल्यामुळे पती संतापला अन् आठ दिवस मला…; प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा
40 वर्षांनंतर ‘नदिया के पार’ चित्रपटातील कलाकार दिसतात असे, काहींनी तर सोडलंय जग, पहा फोटो
रणदीप हुड्डा साकारणार स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका, मांजरेकरांचे दिग्दर्शन; पहा फर्स्ट लूक