अलीकडे तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणत वाढलेले पाहायला मिळते. अनेकांनी व्यसनाने जीव देखील गमवला आहे. मात्र तरी देखील याचे प्रमाण कमी होताना दिसतं नाहीये. अशीच एक धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका तरुणाने गुटखा तोंडात टाकला आणि तरुणाला ठसका लागला त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कुटुंबीयांवर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. आणि औरंगाबादमध्ये या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
तर जाणून घेऊया नेमकं घडलं काय? ही घटना औरंगाबाद शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात घडली आहे. गणेश जगन्नाथ दास असे या मृत तरुणाचे नाव असून या तरुणाचे वय फक्त 37 वर्षे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी तो साहुजी यांच्या घरी टीव्हीची डिश बसवण्याचे काम करत होता. हे काम सुरु असताना त्याने गुटखा खाल्ला आणि जोराचा ठसका लागला. या ठसक्यामुळे तो अचानक बेशुद्ध पडला. तत्काळ तरुणाला दवाखान्यात नेण्यात आलं.
मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तसेच गणेश यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. गणेशच्या मृत्यूने कुटुंबियांवर जबर धक्का बसला आहे. या मृत्यूची नोंद उस्मानपुरा पोलिसात करण्यात आली.
दरम्यान, याचबरोबर गणेश यांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होण्यासाठी पोस्टमॉर्टेम करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पोलिसांना पोस्टमॉर्टेमचा अहवाल मिळाला. त्यात ठसका लागल्याने सुपारीचे खांड घशात अडकल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले.
महत्त्वाच्या बातम्या
मी पंतप्रधान मोदींना घाबरत नाही, थेट आव्हान देऊ शकतो; मलिकांचा हल्लाबोल
अखिलेश यादव यांचा EVM बद्दल धक्कादायक दावा, राष्ट्रपतींकडे आणि सुप्रिम कोर्टाकडे केली ‘ही’ मागणी
नादच! एका एकरात तब्बल १३० टन ऊस, तेही दु्ष्काळी भागात, महाराष्ट्रातील शेतकऱ्याची देशभर चर्चा
‘माझा बाबा ढेकून’, दत्तूच्या निबंधाने बाईही हादरल्या, पहा हास्यजत्रेच्या उद्याच्या एपिसोडची झलक