Share

पिंपरीतील खळबळजनक प्रकार! ‘भाई’ नाही म्हणाला म्हणून खायला लावली जमिनीवरची बिस्कीटे

pimpari

पिंपरी भागात एक धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आहे. भाई न म्हणाल्याच्या कारणावरून तरुणाला जमिनीवरची बिस्कीटे खायला लावल्याचा किळसवाना प्रकार घडला आहे. या घटनेची सध्या परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातं आहे. सध्या या प्रकरणी या तरूणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (young man beaten in pimpri chinchwadpolice arrested five people)

धक्कादायक बाब म्हणजे या घटनेतील प्रमुख आरोपी रोहन वाघमारे हा सराईत गुन्हेगार आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच त्याची तडीपारी संपल्याने तो हद्दीत आला होता. या प्रकरणी २० वर्षीय तरूणाने वाकड पोलीस ठाण्यात रोहनसह प्रशांत आठवडे, आदित्य काटे, प्रेम शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रोहन याने फिर्यादी तरूणाला मोबाईलवर कॉल करून शिवीगाळ केली. तरूणाने रोहनला तू मला फोनवर शिवीगाळ का केली, अशी विचारणा केली. याचा राग आल्याने तू मला रोहन का म्हणालास, मला भाई का नाही म्हणाला, मी या एरियाचा भाई आहे, असे म्हणत रोहनने तरूणाला शिवीगाळ केली.

त्यानंतर रोहनने त्याला भेटण्यास बोलविले. त्यानुसार, तरूण मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास रोहनला भेटायला गेला. त्यावेळी भाई न म्हणाल्याच्या कारणावरून रोहनसह त्याच्या चार साथीदारांनी तरूणाला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. जमिनीवर बिस्किटे टाकुन ती खाण्यास भाग पाडली.

दरम्यान, यामध्ये तो जखमी झाला. सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणात आत्तापर्यंत पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं असून मुख्य आरोपी रोहन हा मात्र फरार आहे. त्याचा शोध वाकड पोलीस घेत आहेत.

तसेच घडल्या प्रकाराबद्दल सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. अलीकडे पिंपरी – चिंचवड भागात अशा प्रकारचे प्रकार घडत असल्याने पालक वर्ग मात्र चिंतेत आहे. तरुणाई गुन्हेगारीकडे वळत आहेत का? असा सवाल सध्या उपस्थित झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
१३ वर्षांनंतर निवृत्त झाला विराट, नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांनीही मारली त्याला मिठी
हा तर संगतीचा परिणाम, कोंबड्यांसोबत राहून कुत्रा भुंकायचं सोडून देऊ लागला बांग, पहा व्हिडीओ
प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदींनी ख्रिस गेल आणि जॉन्टी रोड्स यांना लिहिले खास पत्र; सांगितल्या ‘या’ गोष्टी..
धक्कादायक! कानाखाली मारली म्हणून सासरच्यांनी गळा चिरून सुनेचा केला खुन, असा झाला खुलासा

क्राईम इतर

Join WhatsApp

Join Now