Share

युवा शेतकऱ्याची कमाल! पाणीटंचाईवर मात करीत फुलवली कलिंगडची शेती; कलिंगड थेट दुबई रवाना

kalingd

अलीकडे सुशिक्षित तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात शेतीकडे वळला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस उत्पादन मिळवत आहेत. याचबरोबर शेतीत नवनवीन प्रयोग करून समाजासोमोर एक आदर्श उभा करत आहेत. अशीच एक यशोगाथा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ही यशोगाथा आहे श्रीगोंदा तालुक्याच्या मौजे मांडवगण येथील नवयुवक शेतकरी अजय गवांदे या तरुण शेतकऱ्याची. या शेतकऱ्याने पाणीटंचाईवर मात करत माळरानावर सेंद्रिय शेती फुलवली आहे. यातून त्यांनी लाखोंची उलाढाल केली आहे. सर्व स्तरातून या शेतकऱ्यावर कौतुकाचा वर्षाव होतं आहे.

तर वाचा या तरुण शेतकऱ्याची यशस्वी यशोगाथा.. श्रीगोंदा तालुक्याच्या मौजे मांडवगण येथे युवा शेतकरी अजय गवांदे हे राहतात. तालुक्यात पाणी टंचाई असल्याने अनेक शेतकरी त्रस्त आहे. मात्र अजय गवांदे यांनी अनोखा प्रयोग करून यश मिळवून दाखवले आहे.

यंदा अजय यांनी आपल्या शेतात कलिंगड पिकाची लागवड केली होती. विशेष बाब म्हणजे केवळ दोन एकर क्षेत्रातून त्यांनी 60 टन एवढे विक्रमी कलिंगड उत्पादित केले. त्यांनी उत्पादित केलेल्या एकूण कलिंगडपैकी जवळपास 50 टन कलिंगड दुबई निर्यात करण्यात आले.

तसेच यासाठी अजय यांना कृषी तज्ञ शैलेश ढवळे यांचे अनमोल सहकार्य लाभले. कलिंगड पिकात त्यांनी मिरचीचे यशस्वी आंतरपीक देखील घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, अजय यांचे कलिंगड आठ रुपये प्रति किलो या दराने विक्री झालेत. तसेच अजय सध्या सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे अधिक लक्ष देत आहे.

दरम्यान, एवढंच नाही तर अजय आपल्या शेतात वांगी, कांदा, दोडका, भोपळा, कारले, गवार, भेंडी इत्यादी भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड करीत आहे. यासाठी त्यांनी नियोजनबद्ध पाण्याचे नियोजन केले. याचबरोबर ते आपल्या शेतात सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
यशवंत जाधवांच्या डायरीमध्ये मातोश्रीचा उल्लेख सापडल्यानंतर संजय राऊतांचे मोठे विधान, म्हणाले..
‘आमचा एकच दणकट बसला की आईचं दुध आठवेल’, शिवसेना आमदाराचा काँग्रेस-राष्ट्रवादीला घरचा आहेर
गावसकर-मॅथ्यू हेडन यांची भविष्यवाणी ठरणार खरी? आयपीएलच्या सेमीफायनलमध्ये दिसणार ‘हे’ संघ
“आज खरंच बाबा हवे होते”; अभिनेते विजय चव्हाण यांच्या आठवणीत भावूक झाला मुलगा वरद

इतर ताज्या बातम्या राज्य शेती

Join WhatsApp

Join Now