बॉलिवूड इंडस्ट्रीचा पहिला चॉकलेट बॉय अभिनेता जितेंद्र (Jitendra) हे आज 80 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म 7 एप्रिल 1942 रोजी अमृतसर येथे झाला. जितेंद्र हे बॉलिवूडचे ‘जंपिंग जॅक’ आहे. त्यांनी 1960 ते 90 च्या दशकात अनेक उत्तम चित्रपट दिले. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि त्यांचे सुमारे 121 चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत.(you will be amazed to read Jitendra’s love life)
जितेंद्रची कारकीर्द खूप चांगली राहिली आहे, याचा अंदाज या चित्रपटांच्या संख्येवरून लावता येतो. जितेंद्र त्याच्या चमकदार कामामुळे तसेच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असायचे. या अभिनेत्याने 1974 मध्ये शोभा कपूरसोबत लग्न केले. मात्र त्यांचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. त्यांनी अनेक अभिनेत्रींना डेट केल्याचा दावा केला जात आहे. जितेंद्रच्या वाढदिवशी आम्ही तुम्हाला त्यांच्या अफेअरबद्दल सांगणार आहोत.
रेखा आणि जितेंद्र यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. दोघांची जोडी चाहत्यांना खूप पसंद होती. ‘एक बेचारा’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रेखा आणि जितेंद्र यांच्यात जवळीक वाढू लागल्याचा दावा केला जात आहे. मात्र, त्या दिवसांत जितेंद्र शोभा कपूरला डेट करत होते. रेखामुळे जितेंद्रलाही अनेक चित्रपट मिळाले. रिपोर्ट्सनुसार, जितेंद्रने रेखाला एका चित्रपटात ज्युनियर आर्टिस्टसमोर ‘टाइमपास’ म्हणून संबोधले होते, त्यानंतरच रेखाने जितेंद्रसोबतचे सर्व संबंध संपवले.
यानंतर जितेंद्रच्या आयुष्यात हेमा मालिनीची एंट्री झाली. दोघांचे प्रेम अशा प्रकारे बहरले होते की दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. हेमा आणि जितेंद्र लग्न करण्यासाठी मद्रासमधील एका मंदिरात पोहोचलेही होते, असा दावा केला जात आहे. पण धर्मेंद्र यांनी ते होऊ दिले नाही. शोभा कपूरला घेऊन धर्मेंद्र हेमा आणि जितेंद्रच्या लग्नाच्या ठिकाणी पोहोचले, त्यानंतरच हेमा आणि जितेंद्रचे नाते संपुष्टात आले. हेमाने लग्न करण्यास नकार दिला होता.
हेमा मालिनी यांच्यानंतर जितेंद्रचे नाव श्रीदेवीसोबत जोडले गेले होते. दोघांनी एकत्र ‘हिम्मतवाला’, ‘जानी दोस्त’, ‘जस्टिस चौधरी’ सारख्या अनेक चित्रपटात काम केले. असा दावा केला जातो की 1983 मध्ये रिलीज झालेल्या ‘हिम्मतवाला’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जितेंद्र आणि श्रीदेवी यांच्यात जवळीक वाढू लागली होती. त्या दिवसांमध्ये त्यांच्या नात्याच्या बातम्या बॉलिवूडमध्ये चर्चेत होत्या. तोपर्यंत जितेंद्रचे लग्न शोभा कपूरशी झाले होते, त्यामुळे शोभा कपूरही या बातम्यांमुळे नाराज झाल्या होत्या. असा दावा केला जात आहे की, एकदा शोभा यांनी श्रीदेवीला डिनरसाठी बोलावले होते आणि दोघींच्या या भेटीनंतर श्रीदेवीने जितेंद्रसोबतचे सर्व संबंध तोडले.
जितेंद्र यांचे नावही जयाप्रदा यांच्याशी जोडले गेले होते. अनेक रिपोर्ट्समध्ये जितेंद्र आणि जयाप्रदा यांचे नाते खूपच खास असल्याचा दावा करण्यात आला आहे. दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केले आणि नंतर ते वेगळे झाले. दोघांनी ‘स्वर्ग से सुंदर’, ‘संजोग’, ‘लोक परलोक’, ‘ऐसा प्यार कहाँ’ यांसारख्या अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
रेखाला या अभिनेत्याने जबरदस्तीने तब्बल ५ मिनीटं केलं होतं किस, स्वत:च केला होता या गोष्टीचा खुलासा
सनी देओलपेक्षा फक्त ८ वर्षे मोठी आहे त्याची सावत्र आई हेमा मालिनी, झाला होता मोठा वाद
श्रीदेवीचा राग कमी करण्यासाठी अमिताभ बच्चनने पाठवली होती टेम्पोभर गुलाबाची फुलं
या अभिनेत्याने रेखासोबत अंघोळ करण्याचा धरला होता हट्ट, अशी होती रेखाची प्रतिक्रिया