काही आठवड्यानंतर होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताचा बॅडमिंटन संघ जाहीर झाला. त्यात २ सुवर्णपदक विजेती, फुलराणी सायना नेहवालचा समावेश नाही. ती कॉमनवेल्थ गेम्सच्या भारतीय बॅडमिंटन संघाचा भाग नसणार आहे. तिची निवड न झाल्याने तिचा नवरा आणि प्रशिक्षक परुपल्ली कश्यप चांगलाच भडकला. सायनाचा अपमान झाल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. (You on your own people.., Saina Nehwal’s husband raged)
परुपल्ली कश्यप सायनाची निवड न झाल्याबद्दल फार नाराज असल्याचे दिसून आले. त्याने म्हंटले आहे की, ‘हा सायनाचा अपमान आहे, यावरून तुम्ही तुमच्याच लोकांशी कशा प्रकारे वागता हे दिसून येते.’
सिंगापूरमध्ये झालेल्या स्पर्धेत चीनच्या बिंगजिओचा पराभव करून सायना उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर तिची मनस्थिती काय होती? यावर पण त्याने भाष्य केले. तो म्हणाला, ‘तिच्या डोळ्यात रोज पाणी असतं. आम्ही जेव्हा फोनवर बोलत असतो, त्या प्रत्येक संभाषणात संघातून डावलले जाण्याचा मुद्दा येतोच.’
‘संघातून डावलले गेल्यानंतर सराव करणे खूप अवघड असते. कारण यावेळी मनस्थिती वाईट असल्याने आपण आपल्याच लोकांविरुद्ध लढत आहोत की प्रतिस्पर्ध्या विरोधात लढायचे, या गोंधळात माणूस असतो,’ असं तो म्हणाला.
‘सायना उद्धट आहे, असा काहींचा ग्रह आहे. कारण ती जास्त बोलत नाही. तिला दुसऱ्यांशी काही घेणदेण नसतं. पण ते निवडीबाबत तिच्याशी बोलले असते. किमान आदर दाखवला असता, तर ही वेळ आली नसती. तुम्ही नियमांच्या बाबतीत कडक राहू इच्छिता हे मी समजू शकतो. परंतु त्याबाबत संवाद साधायला हरकत नव्हती. कोणी तिच्या मेसेजचा रिप्लाय पण केला नाही. हे अत्यंत दुःखदायक आहे,’ असंही तिच्या पतीने सांगितलं.
पुढे कश्यप म्हणाला की, ‘आपण आपल्या खेळाडूला डावलून पदक जिंकण्याची संधी गमावली आहे.’ दुसरीकडे असोसिएशनचे म्हणणे आहे की, सर्व गोष्टी प्रक्रियेनुसार झाल्या आहेत. सायना जो दावा करतेय, त्यासाठी तिच्याकडे रँक नाही आणि तसा निकाल सुद्धा नाही.
महत्वाच्या बातम्या-
..त्यामुळे १५ ऑगस्टला मिळणारी सुट्टी मोदी सरकारने केली रद्द, ‘असा’ साजरा केला जाणार स्वातंत्र्यदिवस
रावसाहेब दानवेंचा मुलगा झाला शरद पवारांचा फॅन, म्हणाला, त्यांच्या राजनैतिक कौशल्यातून मला…
पती आहे की सैतान? पत्नीला गरम तेलाच्या कढईत उकळले, कारण वाचून पायाखालची जमीन सरकेल