Share

Krushna Prakash: “बाप्पाला तू शेवटपर्यंत जवळ ठेवलंस, गणपती येताहेत अन् तू गेलीस” IPS कृष्णप्रकाश गहीवरले

krushn prakash

कृष्ण प्रकाश(Krushna Prakash): स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ही म्हण सगळ्यांना समान लागू होते. कारण आईशिवाय मुलं पोरकी असतात. असं म्हणतात की, सगळ्यांच्या प्रेमापेक्षा आईचं प्रेम हे नऊ महिने जास्त असते. मुलांनासुद्धा आईच्या कुशीत वाटत इतकं सुरक्षित कुठेच वाटत नाही. याचेच एक उदाहरण म्हणजे, नुकतेच आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश यांच्या आईचे निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कृष्ण प्रकाश समाज माध्यमांवर त्यांच्या अनेक पोस्टमुळे चर्चेत असतात. त्यांच्या पोस्ट प्रेरणादायी असतात. पण आईच्या निधनांनंतर त्यांनी केलेल्या पोस्टमुळे अनेकजण भावुक झाले आहेत. ते म्हणाले, आई, तुझी गणपती बाप्पावर अपार श्रद्धा होती. तू नेहमी तुझ्याजवळ बाप्पाची मूर्ती ठेवायचीस. तुझ्या शेवटच्या दिवसातही तू बाप्पाला जवळ ठेवलंस.

गणपती आता काही दिवसांवर आले आहेत. अशात तू गेलीस. मला हे अपेक्षित नव्हतं. तुझ्याशिवाय मी काहीच नाही, असं कृष्णप्रकाश यांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले की, माझी आई गेली. तिच्याविना मी भिकारी आहे, “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी”, आईचं निधन झालं अन् मी पोरका झालो, भिकारी झालो, असं कृष्णप्रकाश म्हणाले.

कोणत्याही संकटात आपली आई आपल्या नेहमी सोबत असते. त्यामुळे कृष्ण प्रकाश आपल्या आईला कधीही विसरू शकणार नाही. कृष्णप्रकाश म्हणाले “आई नेहमी आपल्यासोबत असते. आधी आपल्या आयुष्यात, नंतर कायमची आपल्या आठवणीत राहते. जेव्हा आपण आपल्या प्रिय व्यक्तीला गमावतो तेव्हा आपल्याला स्वर्गात एक देवदूत मिळतो जो आपल्यावर लक्ष ठेवतो.

मी माझ्या आईला गमावलं आहे. याचं दुःख मी शब्दात सांगू शकत नाही”, असं कृष्ण प्रकाश यांनी पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. आई आणि वडील हे आपले दोन डोळे आहेत. मार्ग दाखवणारे हे डोळे गेले की, आयुष्याला अर्थ उरत नाही. आपल्यावर स्वार्थाशिवाय फक्त प्रेम करणारे आपले आई वडीलच असतात. आईच्या जाण्याने कृष्ण प्रकाश यांना विरह जाणवत आहे.

या दुःखात सांत्वन करण्याकरिता मला अनेकांचे फोन आले. तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद… मला अजूनही विश्वास बसत नाही की माझी आई देवाघरी गेली यावर… तिच्यासाठी प्रार्थना करा. माझ्या कुटुंबाला या अपार दुःखातून जाण्यासाठी धैर्य मिळो, अशी पोस्ट कृष्ण प्रकाश यांनी केली आहे. तसेच मेरी माँ के बराबर कोई नही, असेही त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.

महत्वाच्या बातम्या
मृत्यूच्या 12 तासांनंतर एक चिमुकली अचानक जिवंत झाली आणि…, वाचून पायाखालची जमीन सरकेल
‘एकटा 32 वर्षाचा पोरगा तुमच्या अख्ख्या राजकीय कारगीर्दीला घोडे लावतोय, ते बी नांगरासकट’
Sonali Phogat: सोनाली फोगट यांच्या भावाचा गंभीर आरोप, म्हणाले, माझ्या बहिणीवर बलात्कार करुन..
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी ‘या’ तारखेला होणार, शिवसेना प्रकरण थेट नव्या सरन्यायाधीशांसमोर?

ताज्या बातम्या आरोग्य इतर राज्य

Join WhatsApp

Join Now