Share

तुम्ही बंडखोर नाही, तुम्ही तर हरामखोर आहात, दरोडेखोर आहात; उद्धव ठाकरे कडाडले

उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये काळाचौकी भागात नव्या शिवसेना शाखेचे उद्घाटन केले. त्या प्रसंगी शिवसैनिकांशी त्यांनी संवाद साधला. बंडखोरांना चांगलेच त्यांनी धारेवर धरले होते. आता फक्त निष्ठावंत शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. माझी ही दौलत कोणी माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही, या शब्दात त्यांनी बंडखोर आमदारांना खडे बोल सुनावले. (You are not a rebel, you are a bastard, a robber”was said by Uddhav Thackeray)

उध्दव ठाकरे शिवसैनिकांशी बोलताना म्हणाले की, ‘शिवसेनेने ज्यांच्या मनगटात ताकद दिली. शिवसेनेने ज्या या सगळ्या दगडांना शेंदूर फासला होता. तेच आता शिवसेना गिळायला निघाले आहेत,’ अशा जळजळीत शब्दात त्यांनी बंडखोरांचा समाचार घेतला.

पुढे ते म्हणाले, ‘त्यांच्या मागे जी महाशक्ती आहे. तिचा मोठा डाव आहे. मुंबईवरील आपला शिवसेनेचा ठसा त्यांना पुसायचा आहे. त्या जागी स्वतःचा ठसा उमटवायचा आहे. पण ही शिवसेना संपवत असताना त्यांना ठाकरे आणि शिवसेना हे नात तोडायचं आहे.’

‘ हेच नातं जर तुम्हाला तोडायचं असेल ना..तर हे जे स्वतःला मर्द समजणारे बंडखोर तुम्ही अरे..तुम्ही बंडखोर नाही, हरामखोर आहेत. माझ्या वडिलांचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचा फोटो नका लावू. स्वतःच्या नावाने लोकांमध्ये मत मागा,’ अशा धारदार शब्दात उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवर निशाणा साधला.

‘ पक्ष चोरायला निघाले, माझे वडील चोरायला निघाले..अरे दरोडेखोर आहात तुम्ही,’ असा घणाघाती आरोप त्यांनी बंडखोर आमदारांवर केला. पुढे शिवसैनिकांना ते म्हणाले की, ‘वाढदिवसाला तुमचे पुष्पगुच्छ नको मला, तर हजारो शिवसैनिकांचे सदस्य नोंदणीपत्र आणि पदाधिकाऱ्यांचे शपथपत्र यांचे गट्टेच माझ्यासाठी मोठं गिफ्ट असणार आहेत.’

अशाप्रकारे यावेळी उद्धव ठाकरे यांनी सामान्य शिवसैनिकांना मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी आणि पदाधिकऱ्यांना शपथपत्र देण्याचा आग्रह केल्याचे दिसून आले. शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील वाद हे तर येणारा काळच ठरवेल परंतु सध्या यामुळे महाराष्ट्रात मोठे राजकीय वादळ निर्माण झाल्याचे दिसते.

महत्वाच्या बातम्या-
सत्तेचा माज! भाजप नेत्याच्या रिसॉर्टमध्ये देहविक्रय व्यवसाय; पोलिसांच्या छापेमारीत अनेकांना बेड्या; वाचा नेमकं प्रकरण काय?
आता राष्ट्रवादीची बारी! दोन बडे नेते करणार भाजपात प्रवेश; एक तर आहे तब्बल ६ टर्म आमदार
आदित्य ठाकरेंच्या भाषणावेळीच ‘मातोश्री’चा हुकमी एक्का स्टेजवर; शिवसैनिकांकडून ‘शिवसेनेचा वाघ आला’च्या घोषणा

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now