Share

तु माझी आहे अन् माझीच राहणार; आलियाच्या प्रियकराने लग्न थांबवण्यासाठी उचलले टोकाचे पाऊल

येत्या 17 एप्रिलला बॉलिवूडमधील सर्वांत क्यूट कपलचा म्हणजेच अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूरचा विवाहसोहळा अगदी धूमधडाक्यात पार पडणार आहे. या दोघांच्या विवाहसोहळ्याची तयारी गेल्या आठवड्यातपासूनच सुरु झाली आहे. आलिया आणि रणबीरच्या लग्नाची बातमी आल्यामुळे चाहतेही खूश झाले आहेत.

परंतु अनेक चाहत्यांनाही बातमी ऐकून तितकेच वाईट वाटत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, एका चाहत्याने तर या दोघांचे लग्न मोडण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे. सध्या सोशल मिडीयावर एका व्यक्तीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत आलिया लग्न करत असल्याची बातमी समजात तिचा फॅन सुसाट वेगाने धावत तिच्या भेटीला निघाला आहे. यासोबतच, तु माझी आहे आणि माझीच राहणारे असे या फॅनने ठणकावून सांगितले आहे.

या व्यक्तीचा फक्त व्हिडिओच नव्हे तर त्याचे आलियासोबतचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंना पाहून सर्वांना धक्का बसला आहे. तसेच अनेकांनी या व्यक्तीचा आलियासोबत काय संबंध असा सवाल उपस्थित केला आहे. परंतु दुसरीकडे हे फोटो फेक असल्याचे समोर आले आहे.

आलियाच्या प्रेमापोटी तिच्याच एका चाहत्याने हा व्हिडीओ बनवला असल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. हा व्यक्ती आलियाचा खूप मोठा फॅन आहे. एक कलाकार म्हणून त्याचे आलियावर खूप प्रेम आहे. आलियाच्या लग्नाची बातमी ऐकताच या व्यक्तीला आपला आनंद आवरला नाही. या आनंदातूनच त्याने हा व्हिडिओ तयार केला.

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. लाखोंच्या घरात या व्हिडीओला लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. दरम्यान आलिया आणि रणबीरच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. नुकतेच त्यांच्या लग्नाच्या खरेदीचे व्हिडीओ सोशल मिडीयावर पाहिला मिळाले आहेत.

रणबीर आणि आलियाचा विवाहसोहळा अगदी थाटामाटात पार पडणार आहे. येत्या 13 एप्रिलपासून विवाहाच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. या दोघांच्या लग्नाला बॉलिवूड विश्वातील अनेक लहान मोठे कलाकार हजेरी लावणार आहेत. खास म्हणजे, रणबीर आणि आलिया लग्नानंतर स्विट्जरलैंडला फिरायला जाणार आहेत.

महत्वाच्या बातम्या
बापबेटे जेलमध्ये जाणारच; सोमय्यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळल्यावर सेनेचा ढाण्या वाघ कडाडला
महाराष्ट्र हादरला! पतीने पत्नीच्या डोक्यात घातली कुदळ, पोटच्या पोराला फासाला लटकावले; दोघांना मारून नंतर…
कुटुंबातील पाच पिढ्यांना एकत्र पाहून आनंद महिंद्रा भावूक, म्हणाले, हे जाणून घेण्याची मला इच्छा आहे की..
“राज नव्हे तर उद्धवच बाळासाहेबांचे वारसदार, ते आमच्यासोबत येत नाहीत याचा आम्हाला खेद”

ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now