Share

प्रयागराज हिंसाचाराच्या मास्टरमाईंडच्या घरावर योगींचा बुलडोझर; घरात सापडली घातक शस्रे

नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैंगबर यांच्याविषयी जे वादग्रस्त वक्तव्य केले होते, त्याचे पडसाद देशभरात उमटले आहेत. अनेक ठिकाणी दंगली झाल्या. प्रयागराजमध्ये देखील हिंसाचार पाहायला मिळाला. प्रयागराजला झालेल्या हिंसाचाराचा मास्टरमाईंड जावेद मोहम्मद याचे घर आता जमीनदोस्त करण्यात आले आहे.

हिंसाचारानंतर योगीचा बुलडोझर पॅटर्न प्रयागराजमध्ये सुरू झाला आहे. प्रयागराजला १० जून रोजी झालेल्या हिंसाचाराचा मास्टरमाईंड जावेद याचे घर जमीनदोस्त करण्यात आले आहे. काल १२ जूनच्या दुपारी साडे बाराच्या सुमारास त्याच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला.

कायदेशीर प्रक्रियेत जावेदचे हे घर तोडण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. माहितीनुसार, जावेद मोहम्मद याच्या घराची रविवारी सकाळी पोलिसांनी छापेमारी केली. त्याच्या घरातून दोन पिस्तूलही जप्त करण्यात आल्या आहेत. यासह काडतूसं आणि काही कागदपत्रंही मिळाली आहेत.

त्यानंतर, प्रशासनाने बुलडोझर आणि पोकलेनच्या सहाय्याने जावेदचे घर पाडले. जावेद याचे गौसनगर परिसरात अलिशान घर होते, ते पूर्णपणे तोडण्यात आले. घर तोडण्यापूर्वी काही महत्त्वाच्या वस्तू बाहेर नेण्याची परावनगी देण्यात आली होती. हिंसाचाराच्या प्रकरणात मशिदीच्या मौलानांनाही ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, जावेदचे घर तोडण्यापूर्वी परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली होती. घराच्या बाहेर अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका उभ्या होत्या. परिसरात सुरक्षेसाठी १० हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. ज्या ठिकाणी हिंसाचार झाला ते ठिकाण जावेदच्या घरापासून १० किमी अंतरावर आहे.

माहितीनुसार, आता प्रयागराज नंतर उत्तर प्रदेशमध्ये जिथे जिथे हिंसाचार झाला, त्या ठिकाणच्या आरोपींवर देखील अशीच कारवाई होणार आहे. अनेक ठिकाणी पोलीस बुडडोझरसह आरोपींच्या घरांच्या परिसरात फिरत आहेत. अनेक शहरातील आरोपी आपले घर सोडून पळून गेले असल्याचे बोलले जात आहे.

क्राईम राजकारण

Join WhatsApp

Join Now