उज्जैनच्या बम-बम-नाथ अघोरी बाबा यांनी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांबाबत मोठा दावा केला आहे. तंत्रपूजेच्या माध्यमातून त्यांनी उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावा केला आहे. याशिवाय देशातील मोदी सरकारमध्ये पुन्हा एकदा संधी मिळण्याचा दावाही अघोरींनी केला आहे.
बम-बम-नाथ अघोरी बाबा हे मध्य प्रदेशातील उज्जैन मधील आहेत. उज्जैनच्या स्मशानभूमीत तांत्रिक पूजा ही नवीन गोष्ट नाही, पण निवडणुकीच्या अनुषंगाने तंत्रपूजा आणि यज्ञ-हवनाची पूजा अधिक पाहिला मिळत आहे. याच घाटावर अघोरी बम बम नाथ यांनी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात काम करण्याची संधी मिळणार असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी सातत्याने तांत्रिक विधी केली जात आहे. अघोरी बम बम नाथ बाबा अनेक वर्षांपासून स्मशानभूमीत तांत्रिक विधी करत आहेत. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येतात.
अघोरी बम बम नाथ बाबा म्हणतात की, त्यांचा कोणत्याही धर्म आणि पंथाशी काहीही संबंध नाही, परंतु योगी आदित्यनाथ त्यांच्या नाथ पंथाशी संबंधित आहेत. योगी आदित्यनाथ यांचे काम खूप चांगले झाले आहे. यामुळे उत्तर प्रदेशमधील जनतेने त्यांना पुन्हा एकदा संधी द्यावी. अघोरी यांनी दावा केला आहे की त्यांनी केलेली तंत्रपूजा आजपर्यंत कधीही फेल झालेली नाही.
उत्तर प्रदेश निवडणुकीचे निकाल समोर येतील तेव्हा त्यांच्या दाव्यावर शिक्कामोर्तब होईल. अघोरी बम बम नाथांचे भक्त असलेले इंदूरचे रहिवासी राधेश्याम यांच्या म्हणण्यानुसार, बाबांनी त्यांच्याबद्दल जे काही भाकीत केले होते ते सर्व खरे ठरले. त्यांच्याकडून जो काही दावा केला जातो तो खरा ठरतो.
अघोरी बमबम नाथ यांनी सांगितले की, ते सिंहस्थ 2016 मध्ये योगी आदित्यनाथ यांना भेटले होते. यानंतर त्यांना भेटण्याची संधी मिळाली नाही, मात्र एकच संप्रदाय आणि गुरुभाई असल्याने योगी आदित्यनाथ यांच्यासाठी सातत्याने तंत्रपूजा करत असतात.
सध्या, उत्तर प्रदेश मधील सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीत भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यातच खरी टक्कर असल्याचे बोलले जात आहे. याचबरोबर बसपा आणि काँग्रेसही मतदारांना आपल्या बाजूने आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.