उत्तर प्रदेशात पुन्हा ‘योगींचीच’ची हवा; भाजपला ‘एवढ्या’ जागा मिळण्याचा एक्झीट पोलचा अंदाज

आज पाच राज्यांमधील मतदानाचा शेवटचा टप्पा संपला. निकाल आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 10 मार्च रोजी मतमोजणीनंतर उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा (Uttar Pradesh, Punjab, Manipur, Uttrakhand, Goa) या पाच राज्यांमध्ये कोणाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईलच.

परंतु, अंतिम निकाल येण्याआधीच अनेकांनी आपले अंदाजपंचे निकाल मांडायला सुरुवात केली आहे. रिपब्लिक टीव्हीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा BJPची सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात भाजपाच्या काही जागा कमी होण्याची शक्यता आहे.

रिपब्लिक टीव्हीने प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपा उत्तर प्रदेशमध्ये अडीचशेपेक्षा अधिक जागा जिंकू शकतो, तर समाजवादी पक्षही १०० हून अधिक जागांवर विजयी होईल, असा कल वर्तवण्यात आला आहे. भाजपाला ४५ टक्के जागा मिळण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढं आल्याची माहिती आहे. रिपब्लिक टीव्हीनं उत्तर प्रदेशात भाजपला 262-277 तर सपाला 119-134 तर बसपाच्या 07-15 जागा मिळतील. तर काँग्रेसला 03-08 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

तर दुसरीकडे उत्तराखंडची निवडणूक भाजपासाठी सर्वात आव्हानात्मक आहे. अशा स्थितीत काँग्रेसला पुन्हा सत्तेत येण्याची आशा आहे. याच दरम्यान आता उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसंदर्भात एबीपी सी-वोटरच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला (BJP) धक्का बसणार आहे आणि काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो.

उत्तराखंडमध्ये 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने 57 जागा जिंकल्या आणि प्रचंड बहुमताने आपले सरकार स्थापन केले. तर काँग्रेसला केवळ 11 जागाच मिळाल्या होत्या. दरम्यान आता मात्र उत्तराखंडची निवडणूक भाजपासाठी सर्वात आव्हानात्मक असणार आहे, असे स्पष्ट झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘या आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी तू प्रेरणा ठरणारेस’; अभिनेत्याने केले नागराज मंजुळेंचे तोंडभरून कौतुक
पंतप्रधान मोदींसोबतच्या चर्चेनंतर भावूक झाले युक्रेनचे राष्ट्रध्यक्ष जेलेंस्की; म्हणाले…
‘एकीकडे थोरलेपणाच्या मानाची अपेक्षा अन् दुसरीकडे वैराग्याच्या काळातही ‘बगल में छुरी’
मुंबईकरांवर घोंघावतय चक्रीवादळाचे संकट? अरबी समुद्रात घडताहेत मोठ्या हालचाली