Share

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर रामदेव बाबांनी केलं मोठं व्यक्तव्य; थेट शिवसेनेच्या मुळाशी घातला घाव, वाचा नेमकं काय म्हंटलंय?

ramdev baba
योगगुरु रामदेव बाबा हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. अशातच त्यांनी केलेलं एक राजकीय व्यक्तव्य चर्चेत आलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच बाळासाहेबांचे राजकीय वारसदार असल्याच्या भावना रामदेव बाबा यांनी व्यक्त केल्या आहे.

रामदेव बाबा यांच्या व्यक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. योगगुरु रामदेव बाबा हे नेहमी राजकीय विषयांवर भाष्य करताना पाहायला मिळतात. नुकतच त्यांनी केलेलं व्यक्तव्य आता चर्चेत आलं आहे. सध्या योगगुरु रामदेव बाबा यांनी केलेल्या व्यक्तव्याची चर्चा सुरू आहे.

वाचा नेमकं काय म्हंटलं आहे?

राजकीय वातावरण तापलेलं असतानाच सोमवारी योगगुरू रामदेवबाबांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो फडणवीसांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत. मात्र रामदेवबाबा आणि फडणवीसांच्या भेटीमागील कारण अद्याप समोर आलेलं नाहीये.

तर आज रामदेव बाबा (Yoga Guru Ramdev Baba) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ठाण्यात शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी ही भेट झाली. दोघांमध्ये बंद दाराआड बराच वेळ चर्चा झाल्याची माहिती सध्या मिळत आहे. पण नेहमी चर्चा काय झाली? हे समजू शकलेलं नाहीये.

दरम्यान, शिंदे यांच्याशी भेट झाल्यानंतर रामदेव बाबा यांनी म्हंटलं आहे की, एकनाथ शिंदे हे आमच्या हिंदू धर्माचे, सनातन धर्माचे गौरव पुरुष आहेत. राजधर्मासोबतच सनातन धर्म, ऋषी धर्माला प्रामाणिकपणे ते निभावत असल्याच रामदेव बाबा यांनी म्हंटलं आहे. ते याबाबत माध्यमांशी बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे साहेबांसोबत आमचं आत्मीय प्रेम होतं. एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे मानस, आध्यात्मिक आणि राजकीय वारसदार आहेत. आम्ही मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत महत्त्वाच्या विषयांवर संवाद साधला असल्याची माहिती रामदेव बाबा यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

PHOTO: साऊथच्या दिपीका पदुकोणने बेडरूममध्ये दिली किलर पोज, फोटो पाहून नेटकरी घायाळ
धक्कादायक; लिंगायत संतांचा दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार, आंदोलन पेटलं
T.V. Star: ‘या’ अभिनेत्रीला होते सेक्सचे व्यसन, ७०० पुरूषांसोबत बनवले संबंध, स्वत:च खुलासा करत म्हणाली..
Prime Minister: ‘तो’ शब्द ऋषी सुनक यांना पडलं महागात, पंतप्रधान शर्यतीत पडले मागे, आपल्याच पायावर मारली कुऱ्हाड

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now