गुढीपाडव्याच्यानिम्मिताने आझाद मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे मेळावा घेतला होता. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही जहरी टीका केली होती. शरद पवारांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासूनच राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याचे राज ठाकरे यांनी यावेळी म्हटले होते.
त्यांच्या या वक्तव्यावर जनमत जाणून घेण्यासाठी एका वेबसाईने ट्विटरवर सर्वेक्षण राबविले होते. या सर्वेक्षणातून राज ठाकरेंच्या या मताशी अनेकांनी सहमती दाखवल्याचे समोर आले आहे. या वेबसाईटने ट्विटरवर जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार असल्याचा राज ठाकरेंचा आरोप पटतो का? असा प्रश्न जनतेला विचारला होता.
यावर उत्तर देत अनेकांनी होय असे म्हटले आहे. तर काहींनी या वक्तव्याला विरोध दर्शविला आहे. या वेबसाईटच्या पोलमध्ये ७६९७ वाचकांनी आपली मते नोंदविली होती. त्यातील तब्बल ७४.५ टक्के वाचकांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याला बरोबर म्हटले आहे. तसेच २३.१ टक्के वाचकांनी या वक्तव्याला चूकीचे म्हटले आहे.
या पोलनुसार, २.४ टक्के वाचक तटस्थ असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु ७४.५ टक्के लोकांना राज ठाकरेंचे वक्तव्य पटले असल्याचे दिसून आले आहे. यामुळे खरच राज्यात जातीपातीचे राजकारणाला शरद पवार जबाबदार असल्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. वेबसाईच्या या ट्विटला २७४ जणांनी लाईक केले आहे.
तर २२७ वाचकांनी रिट्विट केले आहे. या ट्विटवर अनेक कमेंन्ट देखील आल्या आहेत. कमेंन्टमध्ये काहींनी शरद पवारांची बाजू घेतली आहे तर काहींनी राज ठाकरेंना पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी “याआधी जात नव्हती का? होती, पण त्याआधी जातीचा अभिमान होता.
मात्र, १९९९ मध्ये जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हा यांनी दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला,” असा आरोप मेळाव्यात शरद पवारांवर केला होता. यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाल्याचे दिसून आले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज ठाकरे यांना चांगलेच सुनावले आहे.
अजित पवार यांनी राज ठाकरेंवर टीका करत, “शरद पवारांचे राजकारण बघितले तर कुठेही जातीयवादी राजकारण दिसणार नाही. त्यांनी सर्वधर्मसमभावाचे राजकारण केले. एका कार्यक्रमात मुलाखत घेतली, तेव्हा पवारसाहेब जातीयवादी नव्हते. पण, आता हा पठ्ठ्या म्हणतो, जातीचं राजकारण केलं, काय बोलावे आता,” असे म्हटले आहे.
मुख्य बातम्या
‘ही’ कार खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड, महिन्याभरात झाले १० हजार बुकींग्स, वाचा किंमत आणि फिचर्स
आधी गांधीजींना नमस्कार करा मग मिडीयाला करा, अरविंद केजरीवाल यांचा तो फोटो शेअर करत निर्मात्याचा टोला
मुलीच्या लग्नासाठी ७ वर्षात ५० लाखांचा फंड जमा करायचा आहे? काळजी करू नका, आम्ही तुम्हाला सांगतो
धक्कादायक! डॉक्टरने नकळत स्वत:चे वीर्य वापरून महिलेला केले गर्भवती, ४५ वर्षांनंतर खुलासा झाल्यानंतर..