टिकटॉकनंतर इंस्टाग्राम रिल्स तरुणाईच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे. लाखो रिल्स सोशल मीडियावर अपलोड होत असतात. त्यात कोणते रिल सुपर हिट ठरेल, हे काही सांगता येत नाही. दररोज कितीतरी व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये एक तरुणी बेभान होऊन व्हिडिओ बनवत होती. आश्चर्याची बाब म्हणजे ही तरुणी व्हिडिओ बनवत असताना एका बैलासमोर नाचत होती. बैलाला हे सगळे नवीन असल्यामुळे तो बैल तिला मारण्यासाठी तिच्याकडे धावला. या तरुणीसोबत असा प्रसंग अचानक घडल्याने तिला काहीच समजले नाही. रिल बनवायचे सोडून तिनेही बैलापासून पळ काढला.
हा मजेशीर व्हिडिओ ‘ bhutani_ke_memes ‘ या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनीही या व्हिडिओला पसंती दर्शवली असून लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. कमेंट करत असताना एक युजर म्हणाला, बैलासमोर नाचले की तो अंगावर येणारच. तर दुसरा युजरने हे तर होणारच होते अशी कमेंट केली आहे.
सुदैवाने या तरुणीला कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा व्हिडीओ जरी सोशल मीडियावर धुमाकुळ घालत असला तरी कधी कधी असे कृत्य तरुणाईच्या अंगलट येऊ शकते. इंस्टाग्राम असो की फेसबुक तरुणाई या सोशल मिडीयावर प्रसिद्ध होण्यासठी वेगवेगळे व्हिडिओ, फोटो अपलोड करत असतात.
मग हे फोटो किंवा व्हिडिओ एखाद्या धोक्याच्या ठिकाणी जाऊन काढायला कसलाही विचार करत नाही. आपण असे फोटो किंवा व्हिडिओ अपलोड केला कि आपण जास्त प्रसिद्ध होऊ, अशी त्यांची भावना असते. परंतु असे खतरनाक स्टंट करताना कित्येक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
सोशल मीडियामुळे जग जवळ आले आहे. परंतु कमेंट्स, व्ह्यूज आणि लाइक्सला विनाकारण महत्त्व देत आहेत. जर आपल्या पोस्टला लाईक किंवा कमेंट मिळाल्या नाही की ही तरुणाई नैराश्यात जाते. त्यामुळे त्यांचे शारिरीक तसेच मानसिक संतुलनही ढासळते.