आयपीएलच्या पहिल्या सिजनमध्ये म्हणजेच २००८ मध्ये पाकिस्तानी खेळाडूंनी देखील भाग घेतला होता. पहिल्या सत्रात शोएब अख्तरसह अनेक पाकिस्तानी खेळाडू वेगवेगळ्या फ्रँचायझींसाठी खेळले. असे अनेक खेळाडू होते जे त्या सिजनचा भाग होऊ शकले नव्हते आणि पुढील सिजनमध्ये ते खेळतील अशी अपेक्षा होती. (yasir arafat on shahrukh khan)
आयपीएलसाठी खेळण्याची अपेक्षा असणाऱ्या खेळाडूंमध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू यासिर अराफत हा पण होता. पण २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. आता यासिर अराफतने शाहरुख खानबाबत एक मोठा खुलासा केला आहे.
पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू यासिर अराफतने सांगितले की, कोलकाता नाईट रायडर्स (KKR) चा मालक आणि बॉलीवूड स्टार शाहरुख खानला मी संघाचा भाग बनावं अशी इच्छा होती. शाहरुखने मला कोलकाता नाईट रायडर्ससोबत ३ वर्षांच्या करारासाठी तयार केले होते.
संबंधित घटना ही आयपीएलच्या दुसऱ्या सिजनची म्हणजेच २००९ ची आहे. एका यूट्यूब चॅनलवर अराफत म्हणाला की, आयपीएलच्या पहिल्या सत्रात केवळ ११ पाकिस्तानी खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली, मी त्यात सहभागी नव्हतो. पण दुसऱ्या सिजनसाठी कोलकाता नाइट रायडर्सचा मालक आणि बॉलिवूड स्टार शाहरुख खानने माझ्याशी संपर्क साधला होता.
यासिर अराफत म्हणाला, त्यावेळी मी इंग्लंडमधील केंटसाठी कौंटी क्रिकेट खेळत होतो, जिथे कोलकाता नाईट रायडर्सचा स्काऊट संघ भारतातून आला होता. स्काऊट संघाने सांगितले की, शाहरुखची इच्छा आहे की तू त्यांचा संघ कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळावे. पण त्यावेळी माझा यावर विश्वास बसत नव्हता, मला वाटले की हा फक्त एक विनोद आहे.
अराफतने पुढे सांगितले की, काही दिवसांनी त्यांना एक मेल आला. कराराशी संबंधित गोष्टींसाठी आपण संपर्क साधला नाही, असे या मेलमध्ये म्हटले होते. यानंतर शाहरुखनेच मला फोन करून कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळण्यास सांगितले. या गोष्टीनंतर मुंबईत दहशतवादी हल्ला झाला. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंवर आयपीएलमध्ये बंदी घालण्यात आली होती. यामुळे मी आयपीएलमध्ये खेळू शकलो नाही.
महत्वाच्या बातम्या-
कुलरचा कहर सुरूच! आजोबा, नातूनंतर नातीचाही गेला जीव, तर आईची मृत्यूशी झुंज सुरूच; घटनेने खळबळ
औरंगाबादच्या सभेपूर्वी इफ्तार पार्टीला येऊन जा; इम्तियाज जलील यांनी राज ठाकरेंना दिले आमंत्रण
लता मंगेशकरांच्या ‘त्या’ गाण्याबाबत दिली चुकीची माहिती, तारक मेहताच्या टीमने मागितली माफी