राजकारणात कधी काय होईल हे सांगू शकत नाही. अलीकडे कोणाची विधाने चर्चेत येत आहेत, तर कोणाचे घोटाळे उघड होतं आहे. सध्या शिवसेनेच्या गोटातून अनेक घडामोडी पुढे येत आहेत. शिवसेना नेत्यांनी आपल्याच सरकारमधील पक्षावर केलेली टीका असो किंवा केलेली वादग्रस्त वक्तव्य असो.
मात्र सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे आईचा हिशोब ठेवणाऱ्या आधुनिक श्रावण बाळाची म्हणजे शिवसेना नेते यशवंत जाधव यांची. तर जाणून घ्या सविस्तर नेमकं हे प्रकरण काय..? यशवंत जाधव हे मुंबई महापालिकेच्या माजी स्थायी समिती अध्यक्ष आहेत. सध्या ते अडचणीत असून ते ईडीच्या रडारवर आहेत.
शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव आणि त्यांची पत्नी आमदार यामिनी जाधव यांच्याकडे प्राप्तिकर विभागाने केलेल्या चौकशीत १२ शेल कंपन्या प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. तसेच जाधव कुटुंबीयांसह त्यांचे निकटवर्तीयांच्या ३३ ठिकाणी छापेमारी केली. यातून महत्त्वाची माहिती समोर आल्याचे सांगितले जात आहे.
प्राप्तिकर विभागाने केलेल्या कारवाईतून कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी असलेली जाधव यांची डायरी विभागाला सापडली. या डायरीतील एका नोंदीमध्ये ‘मातोश्री’ला ५० लाख रुपयांचे घड्याळ आणि दुसऱ्या नोंदीमध्ये गुढीपाडव्याला ‘मातोश्री’ला २ कोटी रुपयांची भेट पाठवल्याचा उल्लेख आढळल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
मात्र जाधवांनी आपण स्वतःच्या आईला पैसे दिल्याचा दावा केला आहे. प्राप्तिकर विभागाने २५ फेब्रुवारी रोजी जाधव कुटुंबीयांसह त्यांचे निकटवर्तीय बिमल अगरवाल तसेच ५ कंत्राटदारांसह ३५ ठिकाणी छापे टाकले. शोधमोहिमेत जप्त केलेल्या पुराव्यांमधून ३० कोटी रुपयांपेक्षा अधिक ३६ स्थावर मालमत्तांची माहिती हाती लागली आहे.
जाधव यांच्यावर कारवाई करताना आयकर विभागाला (Income Tax Department) एक डायरी आढळून आली. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाचे नाव ‘मातोश्री’ आहे. त्यामुळे या डायरीत असलेला उल्लेख उद्धव ठाकरेंबाबतचा आहे का अशी चर्चा सुरू आहे. या चर्चेत थेट ठाकरेंचं नाव आल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
मात्र यशवंत जाधव यांनी ‘मातोश्री’ म्हणजे माझी आई असाही खुलासा केला आहे. तर दुसरीकडे आईला दोन कोटींचं गिफ्ट देणं आणि ते डायरीत लिहून ठेवणारे यशवंत जाधव हे आधुनिक श्रावण बाळ असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरुण आता राजकारण देखील सुरू झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मौन म्हणजे वादळापूर्वीची शांतता? संजय राऊतांचं ‘ते’ ट्विट झालं व्हायरल
मुलीला छेडल्यामुळे बापाने दिली ‘ही’ शिक्षा; वाचून पायाखालची जमीन सरकेल
ठाकरे सरकार येणार गोत्यात? जाहीर कार्यक्रमात तलवारबाजी आली अंगाशी; नेत्यांवर गुन्हा दाखल
विरोधकांवर डळकाळी फोडणारा शिवसेनेचा ढाण्या वाघ झाला शांत; ट्विट करुन स्पष्टच सांगितलं