कन्नड सुपरस्टार यश सध्या त्याचा नुकताच रिलीज झालेला ब्लॉकबस्टर चित्रपट KGF 2 चा आनंद घेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. या चित्रपटात यशने रॉकी भाई नावाच्या अँटी हिरोची भूमिका साकारली होती. दरम्यान, नुकताच सुपरस्टार यशने पत्नीसोबत चित्रपटाची सक्सेस पार्टी एन्जॉय केली. जिथे या स्टार कपलच्या अतिशय रोमँटिक फोटोंनी इंटरनेटला हादरवून सोडले आहे. या फोटोंमध्ये, सुपरस्टार यश त्याची पत्नी राधिका पंडितवर अतुलनीय प्रेमाचा वर्षाव करत आहे.(Yash got romantic with his wife)
फिल्मस्टार राधिका पंडितने अलीकडेच तिचा पती यशसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये फिल्मस्टार राधिका पंडित तिच्या पतीसोबत रोमँटिक होताना दिसत आहे. शेअर केलेल्या या फोटोंमध्ये फिल्मस्टार यशची नजर त्याची पत्नी राधिकावर खिळलेली आहे. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
यादरम्यान फिल्मस्टार यशने पत्नी राधिकाला बीचवर किस केले. ही सुंदर छायाचित्रे KGF 2 चित्रपटाच्या सक्सेस बॅश ऑन द सीसाइडची आहेत. यावेळी चित्रपट कलाकार यश आणि राधिका एकमेकांमध्ये हरवलेले दिसले. दोघांचे फोटोंना सोशल मीडियावर प्रचंड प्रेम मिळत आहे.
चित्रपट कलाकार यश आणि राधिका यांनी KGF 2 च्या सक्सेस बॅश दरम्यान एकसारखे पोशाख परिधान केले होते. पोस्ट शेअर करताना राधिका पंडितने कॅप्शन दिले, “रंगीत चष्म्यांसह पहात आहे”. ही पोस्ट शेअर करताच चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या. एका चाहत्याने लिहिले, “माश-अल्लाह… तर दुसऱ्याने खूप प्रेम लिहिले, तर आणखी एका चाहत्याने लिहिले, मेड फॉर इट अदर”
यशचा KGF: Chapter 2 हा आतापर्यंतचा सहावा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. रविवारी, चित्रपटाने 64.83 कोटी रुपयांची कमाई केली आणि एकूण 900कोटीच्या घरात कमाई गेली आहे. या चित्रपटात संजय दत्त, श्रीनिधी शेट्टी आणि रवीना टंडन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
राधिका पंडितने स्वतःचा आणि यशचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती मुलांसोबत दिसत आहे. पोस्टमध्ये लहान मुले खेळण्यांसोबत खेळताना दिसतात. राधिकाने हार्ट इमोटिकॉनद्वारे ही पोस्ट शेअर केली आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, यश पुढे KGF च्या तिसऱ्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
KGF चं वादळ थांबवणे बॉलिवूडकरांना अशक्य, १३ व्या दिवशीही केली आभाळाला भिडणारी कमाई
KGF मध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता एकेकाळी होता यशचा बॉडीगार्ड, वाचा रंजक कथा
KGF 2 ने शाहिदच्या JERSEY ला दिला जोरदार झटका, पहिल्या दिवशी झाली फक्त एवढी कमाई
KGF 2 चा रेकॉर्ड मोडणार शाहरुखचे हे चित्रपट? पठाण नंतर या चित्रपटांद्वारे घालणार धुमाकूळ