विवेक अग्निहोत्रीच्या (Vivek Agnihotri) दिग्दर्शनाखाली बनलेला ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाचा बोलबाला असून काही लोक या चित्रपटाचे समर्थन करत आहेत, तर काही लोक विरोधही करत आहेत. या चित्रपटाच्या मुद्द्यावरून बॉलिवूडही दोन गटात विभागलेले दिसते. अभिनेत्री स्वरा भास्करनेही (Swara Bhasker) या चित्रपटावर टीका करत दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर निशाणा साधला आहे.(Yami Gautam also praised The Kashmir Files)
https://twitter.com/ReallySwara/status/1502983266789654535?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1502983266789654535%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fmovie-masti%2Fnews-from-bollywood%2Fswara-bhasker-takes-a-dig-at-vivek-agnihotri-and-yami-gautam-comes-in-support-of-the-kashmir-files%2Farticleshow%2F90222247.cms
स्वरा भास्करने चित्रपटाचे किंवा विवेक अग्निहोत्रीचे नाव न घेता एक ट्विट केले, ज्यानंतर तिला सोशल मीडियावर खूप टीकेला सामोरे जावे लागले. स्वराने तिच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या यशानंतर तुमच्या मेहनतीबद्दल कोणी अभिनंदन करावे, तर पहिल्या 5 वर्षांत त्यांच्या डोक्यावर बसून कचरा पसरवू नका.’ या ट्विटवरून युजर्सनी अंदाज लावला की स्वराने विवेक अग्निहोत्रीवर निशाणा साधला आहे आणि त्यानंतर तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
तर दुसरीकडे अभिनेत्री यामी गौतमने ‘द काश्मीर फाइल्स’ आणि विवेक अग्निहोत्रीचे कौतुक केले आहे. लोकांना चित्रपट पाहण्याची विनंती करत यामीने तिच्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘काश्मिरी पंडिताशी लग्न केल्यामुळे मला माहित आहे की शांतता प्रिय समाजाला कसे अत्याचार सहन करावे लागले. पण आपल्या देशातील बहुतांश लोकांना याची कल्पना नाही. या चित्रपटाद्वारे सत्य जाणून घेण्यासाठी 32 वर्षे लागली. कृपया काश्मीर फाइल्स पहा आणि सपोर्ट करा.
https://twitter.com/yamigautam/status/1503309301968150532?t=Zghz3tt3kHgEi1nfqvRaNQ&s=19
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित, ‘द काश्मीर फाइल्स’ मध्ये 1990 मध्ये काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाचा इतिहास आहे. हा तोच काळ होता जेव्हा काश्मिरी पंडितांना वाढत्या बंडखोरी आणि अत्याचारांमुळे खोऱ्यातील घरे सोडून रातोरात पळून जावे लागले होते. काश्मिरी हिंदूंवर इस्लामिक दहशतवादाच्या क्रूरतेच्या शेकडो कहाण्या आहेत, ज्या ऐकून तुम्हाला रडू येईल.
काश्मिरी हिंदूंच्या हत्याकांडावर आधारित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट विवेक रंजन अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, फारुख मलिक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपट पाहून चित्रपटगृहातून बाहेर पडणाऱ्यांना अश्रू आवरता येत नाहीत, असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
केंद्र सरकारची भन्नाट योजना, जन धन खाते धारकांना दर महिन्याला मिळणार तीन हजार रुपये
१२ रुपयांच्या या शेअरने गुंतवणूकदारांना दिला बंपर परतावा, एका लाखाचे झाले १.६४ कोटी रुपये
‘देवमाणूस’मधील ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता अजूनही चालवतो रिक्षा, कारण वाचून डोळे पाणावतील