चित्रपसृष्टीत उत्कृष्ट भूमिका साकारण्यासाठी कलाकार खूप कष्ट घेत असतात. आपण साकारत असलेल्या भूमिकेसाठी कलाकार रात्रीचा दिवस करतात. त्यांच्या या उत्कृष्ट अभिनयामुळे ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करते. काही वेळा कलाकारांना कथानकाची गरज पाहून बोल्ड सीन्स ही द्यावे लागतात.
मात्र मराठी चित्रपटापेक्षा हिंदी चित्रपटात बोल्ड सीन्स दाखवण्याचे प्रमाण जास्त आहे. याचा अर्थ असा नाही की, मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार बोल्ड सीन्स देत नाहीत. मराठी चित्रपटसृष्टीत अशी एक अभिनेत्री आहे जी बोल्ड सीन्स करायला कधीच मागे पुढे पाहत नाही. ही अभिनेत्री जर चित्रपटाच्या कथेमध्ये बोल्ड सीन्सची आवश्कता असेल तर ती कधीच विचार करत नाही.
तिने आतापर्यंत अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत. तिच्या सीन्समुळे मागील अनेक वर्षांपासून तिचे नाव बॉलिवूडमध्ये गाजत आहे. या अभिनेत्रीने वेब सीरिजपासून ते अगदी चित्रपटापर्यंत आपलाच बोलबाला कायम ठेवला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मराठमोळी राधिका आपटे आहे. राधिका ही अनेक मुद्द्यांवर आपले ठामपणे मत मांडत असते.
अशीच ठाम ती आपल्या भूमिका निवडण्याबाबत ही असते. तिने साकारलेल्या भूमिकेने नेहमी प्रेक्षकांना प्रभावी केले आहे. राधिकाचे हे बोल्ड सीन्स आणि इंटिमेट सीन्स पाहून चाहत्यांच्या नजरा तिच्यावरच खिळून राहायच्या. ‘पार्च्ड’ सारख्या चित्रपटातून तिने साकारलेले बोल्ड सीन्स जेव्हा सर्वांनी पाहिले त्यावेळी सेन्सॉरपासून अनेकांना जवळजवळ हादरवून सोडले होतं.
त्यानंतर तिने २०१८ मध्ये ‘द वेडिंग गेस्ट’ यामध्ये देव पटेलच्या सोबत एक बोल्ड सीन देखील केला होता. ती फक्त या भूमिका साकारायची नाही तर, याबद्दल कोणी तिला प्रश्न विचारला तर ती स्पष्टपणे उत्तर द्याची. एका मुलाखतीत राधिका असे ही म्हणाली होती की, क्लीन शेवच्या चित्रीकरणादरम्यान देखील माझा न्यूड व्हिडिओ व्हायरल झाला होता. तेव्हा माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली होती.
संपूर्ण वातावरण एवढे तापले होतं की, मी चार दिवसांपर्यंत घराबाहेरही पडले नव्हते. रधिकाचा कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने सर्व भाषेतील चित्रपटात काम केले आहे. तिने सुपरस्टार रजनीकांत यांच्या सोबत ही मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच अभिनेता अक्षय कुमार सोबत ‘पॅडमन’ यासारखा सुपरहिट चित्रपट केला आहे.