Share

‘या’ अभिनेत्रीमुळे मोडला धनुष आणि ऐश्वर्याचा १८ वर्षांचा सुखी संसार

अभिनेता धनुष यानं आपल्या भन्नाट अभिनयाने लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे धनुष नेहमीच चाहत्यांच्या मनात आणि चर्चेत राहिला. सध्या धनुष चर्चेत येण्याचे कारण म्हणजे ऐश्वर्या रजनीकांत आणि त्याच्यात झालेला घटस्फोट होय. त्यांच्या घटस्फोट नंतर आता त्याचे नाव एका बोल्ड अभिनेत्रीशी जोडलं जात आहे.

सुपरस्टार धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांचे 18 वर्षांचे वैवाहिक नाते संपुष्टात आले आहे. धनुषने 18 नोव्हेंबर 2004 रोजी रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतशी थाटामाटात लग्न केले होते. घटस्फोटाबाबत धनुष आणि ऐश्वर्याने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. त्यामध्ये त्यांनी जे लिहिलं ते वाचून चाहत्यांना धक्का बसला होता.

त्यांनी पोस्ट मध्ये लिहिलं होतं की, “आम्ही 18 वर्षांपासून मैत्री, प्रेमी जोडपे, आई-वडील आणि एकमेकांचे शुभचिंतक म्हणून समजूतदारपणा आणि जबाबदारीचा मोठा पल्ला गाठला आहे. पण, आज आम्ही जिथे उभे आहोत तेथून स्वतःचे मार्ग वेगळे करत आहोत. आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी वेळ द्यायचा आहे. आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आमच्या गोपनीयतेचा आदर करा.”

दरम्यान, धनुषशी संबंधित काही वादाच्या गोष्टी आता समोर येत आहेत. ज्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. म्हटलं जात आहे की, ऐश्वर्या श्रुती हासनची बालपणीची मैत्रिण आहे, मात्र श्रुतीच्या या मैत्रिणीनं तिचा विश्वासघात केला आहे. ‘३’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान धनुष आणि श्रुती हासन एकत्र जास्त वेळ घालवू लागले होते. त्या दिवसांमध्ये धनुष आणि ऐश्वर्याचे लग्न मोडल्याच्या बातम्याही खूप व्हायरल झाल्या होत्या.

2017 मध्ये, एका तामिळ जोडप्याने न्यायालयात अर्ज दाखल केला होता, ज्यामध्ये धनुषला आपला मुलगा असल्याचा दावा करत मासिक 65,000 रुपये पोटगीची मागणी केली होती. आर कथिरेसन आणि त्यांची पत्नी मीनाक्षी या जोडप्याने दावा केला होता की धनुष हा त्यांचा तिसरा मुलगा आहे जो घरातून पळून गेला होता.

त्यानंतर, कथिरेसन यांनी याचिकेत म्हटले होते की अभिनेत्याने त्याच्या शरीरावरील खुणा काढून टाकल्या आहेत आणि न्यायालयात दाखल केलेले जन्म प्रमाणपत्र खरे नाही कारण त्यात धनुषचे नाव आणि नोंदणीचा ​​उल्लेख नाही. ते म्हणाले की ते धनुषचे जन्मदाते पालक आहेत आणि धनुषचे खरे नाव कलाईचेवलन आहे जो अभिनेता बनण्यासाठी चेन्नईतून पळून गेला होता.

तसेच ,साऊथ अभिनेत्री अमला पॉलने 2014 मध्ये फिल्म मेकर एएल विजयसोबत लग्न केले आणि 2016 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. यानंतर विजयने आर ऐश्वर्या नावाच्या मुलीशी लग्न केले. बातम्यांनुसार, अमलाचे लग्न तुटण्याचे कारण म्हणजे धनुषसोबतची जवळीक असं म्हंटलं जात होतं. मात्र, अमलाने नेहमीच अशा बातम्यांचे वर्णन अफवा असल्याचे म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या
निवडणूकीचा नाद सोड! अमित शहा आणि मोदींनी उत्पल पर्रीकरांना स्पष्टच सांगितले
कुणी कल्पनाही केली नसेल अशा ठिकाणी झाली होती धनुष आणि रजनीकांतच्या मुलीची पहिली भेट; वाचा कसे पडले एकमेकाच्या प्रेमात
अर्चना गौतम जिंकली तर चौकातच तिची मान कापून टाकेन, हिंदू महासभेच्या प्रवक्त्याचे धक्कादायक वक्तव्य

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now