पेनी स्टॉक्सने नेहमीच त्याच्या गुंतवणूकदारांना उत्तम परतावा देऊन मालामाल केले आहे. त्यामुळे अनेक किरकोळ गुंतवणूकदार बऱ्याचदा उत्तम परतावा देणारा पेनी स्टॉक्स शोधतात. आता असाच एक पेनी स्टॉक आहे, ज्याने गुंतवणूकदारांना अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिकचा परतावा दिला आहे. याच पेनी स्टॉकबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
गुंतवणूकदारांना उत्तम परतावा देणारा सध्या जो पेनी स्टॉक आहे, तो म्हणजे अद्विक कॅपिटल. अनेक महिन्यांपासून याने आपल्या गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. गेल्या 18 महिन्यात या शेअरने 1700 टक्के इतका जबरदस्त परतावा दिला आहे. त्यामुळे सध्या त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
गेल्या एका आठवड्यात हा शेअर 1.22 टक्क्यांनी वधारला आहे. या एका महिन्याबद्दल बोलायचे झाले तर, या काळात अद्विक कॅपिटलच्या शेअरमध्ये जवळपास 31% वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत त्यात सुमारे 46 टक्के वाढ झाली आहे.
तर यंदा आतापर्यंत हा शेअर 71 टक्क्यांनी वधारला आहे. गेल्या एक वर्षातही त्याने मल्टीबॅगर रिटर्न दिले आहेत. या काळात याच्या किंमतीत सुमारे 340 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 18 महिन्यांपूर्वी या मल्टीबॅगर शेअरमध्ये केवळ 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ही गुंतवणूक कायम ठेवली असती तर या गुंतवणुकदाराला छप्पर फाडके रिर्टन्स मिळाले असते.
एक लाख रुपये गुंतवणुकीवर त्याला 18 लाखांचा परतावा मिळाला असता. साधारण दीड वर्षांपूर्वी बीएसईवरील या शेअरची किंमत केवळ 0.29 पैसे इतकी होती. त्याची किंमत आता 4.97 रुपये झाली आहे. गेल्या आठवड्यात 12 एप्रिल रोजी हा शेअर 5.25 रुपयांवर बंद झाला होता. गेल्या 18 महिन्यात या शेअरने 1700 टक्के इतका जबरदस्त परतावा दिला आहे.
सध्या अद्विक कॅपिटलची मार्केट कॅप सुमारे 110 कोटी रुपये आहे. डिसेंबर 2021 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीला 15 लाख रुपयांचा नफा झाला होता, तर महसुलाचा आकडा 6.13 कोटी रुपये होता. त्यामुळे एकूणच या स्टॉकचा आलेख पाहिला तर गुंतवणूकदारांनी यामध्ये गुंतवणूक करणं त्यांच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.