Share

‘या’ शेतकरी तरूणाने वेधले संपूर्ण राज्याचे लक्ष; पठ्ठ्याने एकट्यानेच मिळवली ९६ टक्के मते

नुकत्याच राज्यातील 32 जिल्ह्यातील 106 नगरपंचायती आणि दोन जिल्हा परिषदांमध्ये 413 जागांसाठी मतदान झाले होते, त्याचे निकाल आता लागलेले आहेत. अनेक ठिकाणची नगरपंचायत निवडणूक ही पाहण्याजोगी ठरली. त्यामध्ये भंडारा जिल्ह्यातील निवडणुकीच्या निकालाने सर्वांचे लक्ष वेधलं.

येथील, प्रदीप पुरुषोत्तम तितीरमारे या उमेदवाराने विक्रमी मतांनी विजय मिळवून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊ मधून काँग्रेसच्या तिकिटावर प्रदीप निवडणूक रिंगणात उतरला. प्रदीपचा संघर्ष पाहून त्याच्याविरोधात निवडणूक लढण्याची कोणाची हिंमत झाली नाही. ज्या दोघांनी हिंमत केली त्यांचा पराभव झाला.

या निवडणुकीत प्रदीपने 96.21 टक्के मिळवत एकतर्फी विजय मिळवला. मतदारांनी 475 पैकी 457 मतांचे दान एकट्या प्रदीपच्या पारड्यात टाकले. विरोधातील उमेदवारांना एकाला नऊ तर दुसऱ्याला केवळ पाच मते मिळाली. त्यामुळे, नगरपंचायत निवडणुकीत इतक्या मोठ्या प्रमाणावर मते मिळवणारा प्रदीप राज्यातील एकमेव उमेदवार ठरला.

त्याच्या या विजयामागे त्याच्या खडतर प्रवासाची पार्श्वभूमी जबाबदार आहे. प्रदीपने वयाच्या 18 व्या वर्षांपासून समाजकारणात आपले पाय रुतवले. प्रभागातील सर्वसामान्य माणसाला अडचणीच्या काळात आधार देण्यासाठी त्याने सदैव आपली उपस्थिती दाखवली. त्याने रात्री अपरात्री गरजू व्यक्तींना मदत केली. त्याच्या या स्वभावामुळे तो गरिबांपासून श्रीमंतापर्यंत लोकप्रिय झाला.

कोरोना काळात देखील त्याने न भिता आणि न थकता सर्व गरिबांची सेवा केली. गरिबांना राशनचा पुरवठा केला.एवढेच नाही तर कोणाचे विजेचे थकलेले बिल देखील त्याने भरले. प्रदीप स्वतः शेतकरी कुटूंबातून आला. त्याने शेती करून स्वतः चा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. त्याने परिसरातील नागरिकांना देखील कुटुंबाप्रमाणे सांभाळले. म्ह्णून लोकांनी देखील त्याला निवडून दिलं.

प्रदीप वयाच्या 34 व्या वर्षी नगरसेवक झाला, तोही सर्वाधिक मतं पदरात पाडून. त्यामुळे राज्यभर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या निवडणुकीत 52 जागांपैकी काँग्रेसला 21 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 13 जागा, भाजपला 12 जागा, शिवसेनेला 1, बसपा 1, वंचित 1 तर तीन अपक्ष उमेदवारांचा विजय झाला आहे.

महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी! सोमवारपासून वाजणार शाळेची घंटा; ठाकरे सरकारने दाखवला हिरवा कंदील
‘लागिरं झालं जी’मधील कलाकारांचे आवाहन; ‘त्या’ बातम्या म्हणजे अफवाच, त्यावर विश्वास ठेवू नका
राम गोपाल वर्मांचे धक्कादायक वक्तव्य; घटस्फोटाचा आनंद साजरा केला पाहिजे, कारण ..

राजकारण

Join WhatsApp

Join Now