Share

भारतातील ‘या’ शेतकऱ्यांना होणार रशिया-युक्रेन युद्धाचा फायदा, विदेशातून पिकांना येणार मागणी

सध्या युक्रेन आणि रशियाच्या चालू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक देशांत या युद्धामुळे महागाई वाढली आहे. असे, असताना या युद्धाचा भारतीय शेतकऱ्यांना मात्र फायदा होत असल्याचे दिसत आहे.

रशिया आणि युक्रेन या दोन देशांचा विचार केला तर हे दोन्ही देश प्रमुख गहू निर्यातदार देश आहेत. मात्र, सध्या चालू असणाऱ्या युद्धजन्य परिस्थितीमुळे या दोन देशांमधील गहू निर्याततिच्या अपेक्षा जवजवळ कमी झाल्या आहेत. नेमक्या याच परिस्थितीचा फायदा हा भारतातील प्रमुख गहू उत्पादक शेतकऱ्यांना होऊ शकतो.

भारतात प्रामुख्याने गहू उत्पादक म्हणून पंजाब राज्याची ओळख आहे. या राज्यातील शेतकरी आणि अडते यांना या युद्धाचा फायदा होऊ शकतो अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. या युद्धामुळे भारत आणि परदेशातील गहू निर्यातदार यांचा डोळा पंजाबकडे आहे.

एवढेच नाही तर आता या गहू निर्यातीच्या व्यापारात आयटीसी आणि अदानी सारख्या बड्या कंपन्या देखील सहभाग घेत असून पंजाब मधील धान्य व्यापारी खूप उत्साही आहेत. जर आपण खन्ना बाजारपेठेचा विचार केला तर येथे जवळजवळ चाळीस लाख टन गव्हाचा साठा याठिकाणी आहे.खन्ना येथे आशियातील सर्वात मोठी धान्याचे बाजारपेठ आहे.

कृषि तज्ज्ञांच्या मते, या युद्धाच्या परिणामामुळे रशिया आणि युक्रेन या देशांवर गव्हासाठी अवलंबून असलेल्या देशांकडून मोठ्या प्रमाणात गव्हाच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. जर हे युद्ध लांबले तर अजून जास्त प्रमाणात नवीन ऑर्डर मिळतील अशी अपेक्षा आहे. जर गव्हाची निर्यात वाढली तर यामध्ये वाढीव दराने गहू विकणे शक्य होईल.

जर या हंगामातील गहू पिकाचा विचार केला तर जेव्हा हंगामातील गव्हाचे पीक शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून येईल तेव्हा खन्ना बाजारपेठेत 200 दशलक्ष टन साठा येण्याचे अपेक्षित आहे. त्यामुळे, आता युक्रेन आणि रशिया युद्धामुळे एकीकडे नकारात्मक गोष्टी घडत आहेत, तर दुसरीकडे पंजाब राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब म्हणता येईल.

आंतरराष्ट्रीय शेती

Join WhatsApp

Join Now