‘बिअर’ चे जगभरात अनेक लव्हर आहेत. जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या फ्लेवरची बिअर बनवली जाते. या बिअर जगभरात मागणी नुसार पुरवल्या जातात. त्यातच सिंगापूरच्या बिअरला जगभरातून प्रचंड मागणी आहे. मात्र ही प्रसिद्ध सिंगापूरची बिअर नेमकी कशापासून बनते हे माहिती झाल्यावर बिअर प्रेमींना धक्का बसेल.
सिंगापूरच्या या प्रसिद्ध बिअर चे नाव न्यूब्रू आहे. ही प्रसिद्ध बिअर लघवी आणि सांडपाण्यापासून बनली जाते. विशेष म्हणजे, ही बिअर जगातील सर्वात इको-फ्रेंडली बिअर म्हणून ओळखली जात आहे. सध्या ही न्युब्रू नावाची बिअर सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
तुम्हांला नक्कीच प्रश्न पडला असेल की, लघवी आणि सांडपाण्यापासून बनवलेली ही बिअर इको-फ्रेंडली कशी असू शकते. पण हे खरंय. पुनर्नवीनीकरण केलेल्या लघवी आणि सांडपाण्यापासून बनवलेल्या या बिअरमध्ये सुगंधी सिट्रा, प्रीमियम जर्मन बार्ली माल्ट, आणि कॅलिप्सो हॉप्स, तसेच नॉर्वे, क्वेक मधील फार्म-हाऊस यीस्ट यासारख्या उत्कृष्ट घटकांचा वापर केला गेला आहे.
यात असलेले निवाटर माल्ट, हॉप्स आणि यीस्ट स्ट्रेनचे स्वाद दूषित करत नाही. न्यूब्रू ही क्राफ्ट बिअर ब्रुअरी ‘ब्रेवर्क्ज़’ द्वारे ८ एप्रिल रोजी सिंगापूर येथे एका आंतरराष्ट्रीय परिषदेच्या संयोगाने लाँच केली गेली. पाण्याच्या पुनर्वापरासाठी आणि जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने न्यूब्रू ही सिंगापूरची सर्वात इको फ्रेंडली बिअर बनविण्यात आली आहे.
सिंगापूरमध्ये पाण्याची टंचाई ही खुप मोठी समस्या आहे. सिंगापूर पिण्याच्या पाण्यासाठी मलेशियाकडून पाणी विकत घेते. माहितीनुसार, न्यूब्रू बिअरद्वारे सिंगापूरच्या पाणीटंचाईबद्दल जागरूकता निर्माण करणे तसेच जलसंकटाचा सामना करणे, हा प्रमुख उद्देश आहे.
याआधी देखील क्राफ्ट बिअर कंपनी ‘स्टोन ब्रूइंग’ ने २०१७ मध्ये ‘स्टोन फुल सर्कल पेले आले’ लाँच केले. ‘क्रस्ट ग्रुप’ आणि ‘स्टोन फुल सर्कल पेल एले’ सारख्या इतर ब्रुअरीजने देखील सांडपाणी पुनर्वापर केलेल्या पाण्याचा वापर करून क्राफ्ट बिअरची स्वतःची आवृत्ती लाँच केली होती.