Share

kolhapur : धक्कादायक! कुस्तीच्या सरावानंतर घडलं विपरीत; पंढरपुरच्या पहिलवानाचा कोल्हापुरात दुर्दैवी अंत

crime news

kolhapur : अलीकडे तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण अधिक वाढल्याने पाहायला मिळतं आहे. मैदानावर खेळताना अनेक खेळाडूंचे मृत्यू झाल्याचे देखील आपण पाहिले आहे. हे सांगण्याच कारण म्हणजे, कोल्हापूरातून देखील अशीच एक धक्कादायक बातमी समोर येतं आहे.

कोल्हापुरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. कुस्तीचा सराव करताना पंढरपूरच्या पहिलवानाचा कोल्हापुरात हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापुरातील तालमीत घडलेल्या या प्रकारामुळे पहिलवानांवर दु: खाचा डोंगर कोसळला आहे.

वाचा नेमकं काय घडलं?
मारुती सुरवसे असं या मृत पहिलवानाचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार 3 ऑक्टोबर रोजी घडला. मारुती सुरवसे हा पहिलवान 23 वर्षीय होता. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मारुती मूळचा पंढरपूर जिल्ह्यातील वाखरीमधील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील तालमीत गेल्या काही दिवसांपासून मारुती सुरवसे हा कुस्तीचा सराव करत आहे. काल मारुती हा रात्री तालमीत कुस्तीचा सराव करुन आंघोळ करत होता. याच दरम्यान अचानक मारुतीच्या छातीत दुखू लागले. तात्काळ मारुतीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मात्र उपचारादरम्यान मारुतीने अखेरचा श्वास घेतला. काळजाचा ठोका चुकवणारी बाब म्हणजे, मयत मारुतीचे वडील वाखरीत शेती करतात. मारुतीला लहानपणापासूनच कुस्तीची आवड असल्याने त्याला कोल्हापूर येथील तालमीत सरावासाठी पाठवण्यात आलं होतं.

दरम्यान, अचानक मारुतीचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दु: खाचा डोंगर कोसळला. कोल्हापुरात देखील हळहळ व्यक्त केली जातं आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा अनेक घडताना आपण पाहिल्या आहेत. यामुळे पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

क्राईम इतर ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now