वरळीत शिवसेना आणि शिंदे गटात तुफान राडा; वाचा नेमकं काय घडलं..

सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फुट पडली आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटात आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. तर आता राज्यात गणेशोत्सव मोठ्या आनंदात पार पडत आहे. मात्र त्यातही राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे.

युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या वरळीतल्या मतदारसंघात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जोरदार पोस्टरबाजी सुरु आहे. शनिवारी शिवसेनेचे (Shiv sena News) पोस्टर शिंदे गटानं काढले होते. त्यानंतर आता युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे पोस्टर फाडले आहेत.

यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वरळी मतदारसंघात शिवसेनेला आव्हान देण्यासाठी भाजपकडून पोस्टरबाजी करण्यात आल्याची चर्चा आहे. वरळीच्या श्रीराम मिल बेस्ट बसवर लावलेला भाजपचा बॅनर हटवण्यात आला. आधी भाजपने शिवसेनेचा बॅनर हटवल्याचा आरोप करत हा बॅनर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी काढला असल्याचं बोललं जातं आहे.

दरम्यान, एका बसस्टॉपवर लावण्यात आलेले भाजपचे पोस्टर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी फाडले आहेत. ‘अंगावर आलातर तर शिंगावर घेऊ,’ असा इशारा युवासेनेच्या वतीने देण्यात आला आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वाद विकोपाला जाणार असल्याच बोललं जातं आहे.

यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा हा चांगलाच चर्चेत आला आहे. शिवसेनेमध्ये दोन गट स्थापन झाल्यामुळे यंदा शिवतीर्थावर दसरा मेळावा कोण आयोजित करणार असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट (Eknath shinde and Uddhav Thackeray) आता दसरा मेळाव्यावरून आमने-सामने आले आहेत.

यंदाचा दसरा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट घेणार की उद्धव ठाकरे यावरुन दोन्ही गटांमध्ये नवी ठिणगी पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर शिवसेनेची ओळख असेलला दसरा मेळावा हायजॅक करण्याचा प्रयत्न शिंदे गटाचा आहे. मात्र अद्याप शिवसेनेच्या या मेळाव्याला परवानगी अद्याप मिळालेली नाही.

महत्वाच्या बातम्या
बंडखोर शिवसेना मंत्र्याने शड्डू ठोकला! उद्या गुवाहाटीहून मतदासंघात येत घेणार जाहीर सभा
ईडीच्या कारवाईमुळे आमदारांनी बंड केलं? दीपक केसरकर म्हणाले, १,२,३…
‘मुलांना जिथे जायचे तिथे जाऊ दे, मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच’; बंडखोर आमदाराच्या वडीलांनी ठणकावले
शमशेराची स्टोरी झाली लीक, ‘अशी’ असेल रणबीर कपूर आणि संजय दत्तची भूमिका, वाचून वाढेल उत्सुकता