workers-angry-on-owner | छत्तीसगडची राजधानी रायपूरमधून मंगळवारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. रायपूरमधील मॅगी पॉइंट रेस्टॉरंट ऑपरेटरची हत्या करण्यात आली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना समजले की, हत्या तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच केली आहे. त्यानंतर त्या दोघांनाही पोलिसांनी पकडले आहे.
पोलिसांनी सांगितले की, ४५ वर्षीय अजय गोस्वामी महाराजा मॅगी पॉइंट नावाने रेस्टॉरंट चालवत होते. मध्य प्रदेशचा रहिवासी सागर सिंग सैयाम आणि ओडिशाचा रहिवासी चिन्मय साहू येथे काम करत होते. गेल्या काही दिवसांपासून अजय गोस्वामी यांचा या दोन कर्मचाऱ्यांसोबत पैशांवरून वाद सुरू होता.
पोलिसांनी दोन्ही कर्मचाऱ्यांची चौकशी केली असता ते म्हणाले, अजय गोस्वामी हे गेल्या अनेक महिन्यांपासून पगार देत नव्हते. पगाराच्या मुद्द्यावरून वारंवार भांडणे होत होती. दिवाळीच्या मुहूर्तावरही पैसे किंवा सुट्टी दिली जात नव्हती. दुसऱ्या दिवशी अजयने काम करायला सांगितले, तेव्हा दोन्ही कर्मचाऱ्यांनी सांगितले की आज सुट्टी आहे, आज काम करणार नाही.
आरोपी पुढे म्हणाला, हे ऐकताच अजयने दोघांनाही काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. आम्हाला मारहाण होत होती, त्यामुळे आम्ही सुद्धा लोखंडी रॉडने अजय यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. आम्ही त्यांना मारहाण केली तेव्हा ते जिवंत होते. ते बेशुद्ध झाले होते.
मारल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली. रेल्वे स्टेशन, भाटा गाव बसस्थानकावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संधी पाहून दोन्ही आरोपींना आपापल्या गावी पळून जायचे होते. मात्र, पोलिसांनी दोन्ही आरोपींना भाटा गावच्या बसस्थानकाजवळून अटक केली.
पोलिसांनी कलम ३०२ अन्वये गुन्हा कारागृहात पाठवण्याची तयारी केली आहे. स्टेशन प्रभारी वेदवती दारिओ यांनी सांगितले की, पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांनी अजय गोस्वामी त्यांच्या दुकानात बेशुद्धावस्थेत पडलेले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
महत्वाच्या बातम्या-
Rohit Sharma : VIDEO: रोहित शर्माने लाईव्ह मॅचमध्ये काढली पॅन्ट, लाजिरवाणा प्रकार कॅमेऱ्यामध्ये झाला कैद
eknath shinde : दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिंदे गटातील ‘या’ आमदारांची लागणार वर्णी? सात नावांची रंगलीये चर्चा
Rohit Sharma : लाईव्ह मॅचमध्ये रोहित शर्माने केले लाजिरवाणे कृत्य ; व्हिडिओ व्हायरल