Share

Election: आमदाराला त्याच्याच साध्या कार्यकर्त्याने धोबीपछाड देत जिंकली निवडणूक; केला सुपडा साफ

popatrao gavade

worker damu anna ghode win in grampanchayat election | राज्यातील ग्रामपंचायतीचे निकाल आता हाती येताना दिसून येत आहे. राज्यात झालेल्या सत्ता बदलानंतर शिरुर तालुक्यात ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती. या निवडणूकीत माजी आमदार पोपटराव पवार यांना जबरधक्का बसला असून ते पराभूत झाले आहे.

माजी सरपंच दामूअण्णा घोडे यांचे पॅनल विजयी झाले आहे. पोपटराव गावडे यांनी शिरुर तालुक्याचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. टाळकी हाजी या मुख्य गावाबरोबरच म्हसे बुद्रुक व माळवाडी या विभक्त झालेल्या ग्रामपंचायतीत गावडे यांच्या पक्षांतर्गत विरोधक दामूअण्णा यांच्या नेतृत्वात एकत्र आले आणि शिवसेना, भाजप आणि इतर विरोधकांनी सत्ता स्थापन केली.

माजी आमदार गावडे आणि माजी सरपंच घोडे हे दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यामुळे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही त्यांची भेट घेत, त्यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न केला होता. पण दोघांनीही माघार न घेतल्यामुळे अखेर निवडणूक लागली.

दामूअण्णा घोडे यांच्या पॅनेलच्या विजयाने बेट भागात पहिल्यांदाच पोपटराव गावडे यांच्या घराण्यासमोर प्रबळ राजकीय पर्याय उभा राहिला आहे. आता येत्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत ते प्रबळ उमेदवार असल्याचे म्हटले जात आहे. घोडे हे आधी गावडे यांचेच कार्यकर्ते होते.

गेल्या २५ वर्षांपासून पोपटराव गावडे यांचा बेट भागावर प्रभाव होता. त्यामुळे अनेकदा टाकळी हाजीसह परिसरतील छोट्या-मोठ्या गावच्या ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध होत आल्या आहेत. दामूअण्णा घोडे हे देखील त्यांच्याच तालमीत तयार झाले होते. त्यामुळे एका कार्यकर्त्यानेच आमदाराला पराभूत केलं अशी संपूर्ण गावात चर्चा रंगली आहे.

घोडे यांच्या पत्नी अरुणा या पंचायत समितीच्या उपसभापतीच्या पदासाठी इच्छुक होत्या. पण तरीही पोपटराव यांनी त्यांना संधी देण्यासाठी प्रयत्न केले नव्हते. त्यामुळे घोडे त्यांच्यापासून दुरावले होते. त्यानंतर त्यांनी बंड करत स्वत:चेच पॅनेल तयार केले आणि निवडणूकीत विजय मिळवला आहे.

महत्वाच्या बातम्या-
Mahesh Babu: आधी म्हणाला बॉलिवूडला मी परवडणार नाही, आता करतोय पदार्पन, साऊथ सुपरस्टार ट्रोल
Rahul Gandhi: राहूल आणि प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात; अक्षरशः रस्त्यावरून फरफटत नेले
Pravin Darekar: ‘मविआ’ला आणखी एक धक्का; दरेकरांची अजितदादा आणि आदित्य ठाकरेंना एकाचवेळी धोबीपछाड

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now