शनिवारपासून देशभरात आयपीएलच्या १५ व्या हंगामाला सुरुवात होणार असल्यामुळे याची उत्सुकता क्रिकेट प्रेमींमध्ये चांगलीच दिसून येत आहे. अशात सर्व क्रिकेट प्रेमींसाठी आणखीन एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुढील वर्षापासून बीसीसीआय महिलांच्या आयपीएल सामन्यांचा प्रारंभ करण्याची योजना आखत आहे.
शुक्रवारी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबतची माहिती दिली आहे. एका वर्षाच्या विश्रांतीनंतर महिलांचे चार प्रदर्शनीय सामने भरविले जाणार आहेत. यासाठी महिलांच्या आयपीएलला सुरुवात करण्यापूर्वी ‘बीसीसीआय’ला वार्षिक सर्वसाधारण सभेची मंजुरी घ्यावी लागणार आहे. महिलांचे ‘आयपीएल’ सुरू करण्यात दिरंगाई झाल्यामुळे सभेची परवानगी मिळणे सर्वांत महत्त्वाचे आहे.
विशेष म्हणजे, महिलांच्या आयपीएलविषयी बोलताना, ‘‘पुरुषांच्या ‘आयपीएल’चे साखळी सामने चालू असताना तीन महिला संघांमध्ये चार प्रदर्शनीय सामने खेळवण्यात येणार आहेत. पहिल्या हंगामात पाच ते सहा संघांचा समावेश असू शकेल, परंतु यासाठीसुद्धा सर्वसाधारण सभेची मंजुरी लागेल,’’ असे ‘आयपीएल’ प्रशासकीय समितीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी म्हणले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, जर पुढील वर्षी महिला आयपीएल सुरु झाली तर प्रदर्शनीय सामने पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर होऊ शकतात. अशातच ‘आयपीएल’च्या प्रसारण हक्काची निविदा २०२३ ते २०२७ या कालावधीसाठी जारी करण्यात येणार आहे. यापूर्वी स्टार इंडियाने १६,३४७.५ कोटी रुपयांमध्ये हे हक्क २०१८ ते २०२२ पर्यंत विकत घेतले होते.
मात्र आता प्रीमियर लीगची लोकप्रियता आणि वाढील संघ बघता या प्रसारण हक्काची किंमत ४० हजार कोटींवर जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मधल्या काळात कोरोना महामारीमुळे आईपीएल २०२१ च्या दुसऱ्या हंगामाला यूएईमध्ये भरविण्यात आले होते. याकारणाने महिला आयपीएल टी२० आयोजित करण्यात आली नाही. परंतु आता सर्वकाही सुरळीत झाल्यामुळे २०२३ मध्ये या महिला आयपीएलला सुरुवात होणार आहे.
अध्यक्ष सौरव गांगुली यांनी महिला आयपीएलची घोषणा केल्यामुळे महिला संघात एक वेगळाच आनंद दिसून आला आहे. यात क्रिकेट प्रेमींच्या आनंदात आणखीन भर पडली आहे. आजपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. हा पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी ठिक ७.३० वाजता सुरु होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
‘या’ क्रिकेटपटूवर आयसीसीने घातली बंदी; फिक्सिंगपेक्षा मोठ्या गुन्ह्यात आढळला दोषी
महावितरणच्या अधिकाऱ्याला संतप्त ग्राहकाकडून मारहाण, तुफान शिवीगाळ; पहा व्हिडीओ
“पाटणकर, यशवंत जाधव, प्रताप सरनाईक हे कोणत्या दंगलीत मुंबईकरांना वाचवत होते?”
ट्विट करायला कोणी पैसै दिले होते का? विवेक अग्निहोत्रींवर ट्विट करणे कुणाल कामराला पडले महागात, युजर्स संतापले