breaks old traditions: अनेक वर्षांची जुनी परंपरा मोडीत काढून आंबेजोगाई येथील धानोरा गावात महिलांनी एकत्रित येऊन मारुती मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. या घटनेनंतर परिसरात चर्चेला उधाण आले. समतेचा हक्कासाठी महिलांनी हे पाऊल उचलले. त्यांच्या या कृतीचे सामाजिक स्तरावर स्वागत केले जात आहे.
महिलांनी मारुती मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करू नये. तो प्रवेश फक्त पुरुषांना असतो. हा अलिखित रिवाज अनेक वर्षांपासून विना अडथळा समाजात पाळला जातो. मात्र या असमान, अन्यायकारक वाटणाऱ्या परंपरेला फाटा देणारे कृत्य आंबेजोगाईमध्ये घडले.
महिलांना मंदिर गाभाऱ्यात प्रवेश नसणे आणि पुरुषांना तू असणे, हा लिंग आधारावर केला जाणारा भेदभाव आहे. महिलांना मासिक पाळी येते. त्या काळात विटाळ मानून त्यांना लांब ठेवले जाते, हे योग्य नाही. महिलांना येणाऱ्या मासिक पाळीमुळे नव्या जीवाचा जन्म होतो, असे परखड मत धानोरा गावातील सामाजिक कार्यकर्त्या आशालता पांडे यांनी व्यक्त केले.
पुढे त्या म्हणाल्या, मासिक पाळीमुळे नवा जीव जन्माला येतो. त्यामुळे महिलांच्या मासिक पाळी येण्याच्या नैसर्गिक प्रकाराबाबत समाजाने आनंद साजरा केला पाहिजे. गावात जो हा परिवर्तनाचा लढा महिलांनी संघटित होऊन उभारला. त्या सगळ्याचा पुढाकार आशालता यांनीच घेतला होता.
आशालता पांडे व चित्रा पाटील या सामाजिक कार्यकर्त्यांनी गावातील महिलांना एकत्रित करून मारुती मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करत नारळ फोडला. मारुती हा ब्रह्मचारी असल्याने त्याच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याचे व नारळ फोडण्याचे काम पुरुष करायचे.
याच रूढीला अन्यायकारक म्हणत महिलांनी मंदिर गाभाऱ्यात प्रवेश केला. संविधानाने आम्हाला समतेचा हक्क बहाल केला आहे. त्यामुळे या पुढेही अधिकाराचा वापर करत महिलांचे संघटन करून अनेक रूढी आणि अंधश्रद्धा मोडीत काढू, असं शेवटी बोलताना आशालता म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या-
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना मैत्रीची हाक, म्हणाले मैत्रीसोबत क्षमासुद्धा…
Corruption : भाजप मंत्र्याच्या कामगाराचा प्रताप! पगार १० हजार अन् राहतोय अडीच कोटीच्या घरात, सांभाळतोय ४ बायका
Shivajirao Adhalrao Patil : शिरूर लोकसभा मतदारसंघातून आढळरावांचा पत्ता कट? भाजप केंद्रीय मंत्र्यांच्या विधानाने टेंशन वाढले