पत्नीवर असलेल्या प्रेमामुळे अनेकदा पती पत्नीसाठी काहीही करायला तयार असतो. काहीवेळा तर पती आपला जीव धोक्यात घालून पत्नीला वाचवतो, अशा घटनाही अनेकदा तुम्ही ऐकल्या असतील. पण आता पारनेरची एक महिला सध्या राज्यभरात चर्चेत आली आहे. तिने आपल्या पतीसाठी थेट बिबट्यालाच झुंज दिली आहे. (women save husband from leopard)
बिबट्याने तिच्या पतीचं डोकं जबड्यात धरलं होतं, असं असतानाही तिनं हार मानली नाही. तिने पतीला वाचवण्यासाठी थेट बिबट्याला झुंज दिली आणि पतीचे प्राण वाचवले. संबंधित घटना ही पारनेरच्या दरोडी चापळदरा येथे घडली आहे. सगळीकडून त्या महिलेचे कौतूक होत आहे.
संजना पावडे असे या महिलेचे नाव आहे. तिने तिच्या पतीला म्हणजेच गोरख पावडेला बिबट्याच्या हल्ल्यातून वाचवले आहे. २५ तारखेला रात्री त्यांच्या घराच्या शेजारी असलेल्या गोठ्यातून काही आवाज येत होते. त्यानंतर तिथे गोरख पावडे गेले. त्यावेळी त्यांनी बघितलं की गोठ्यात बिबट्या शिरल्याने जनावरं बिथरली होती.
गोरख तिकडे जाताच बिबट्याने त्यांच्यावरही हल्ला केला. बिबट्याने त्यांचं डोकं जबड्यात पकडलं होतं. त्यामुळे त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. ही आरडाओरड संजना यांनी ऐकली. त्या धावत गोठ्यात आल्या तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण बिबट्याच्या जबड्यात गोरख यांचं डोकं होत.
ते सर्व दृश्य पाहून त्या हादरल्या होत्या, पण घाबरल्या नाही. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बिबट्याला झुंज दिली. संजना यांनी बिबट्याचे पाय आणि शेपूट ओढत त्याला मागे खेचले. त्यानंतर लगेचच बिबट्याच्या पोटात बुक्क्यांचा मारा केला. तर गोरख यांच्या वडिलांनी बिबट्यावर दगडांचा मारा केला.
सर्व बाजूने हल्ला झाल्यामुळे बिबट्याही घाबरून गेला होता. त्यामुळे काय करावे हे त्यालाही सुचत नव्हते, त्यामुळे त्याने तिथून पळ काढला आणि गोरख यांचा जीव वाचला. संजना यांनी दाखवलेल्या धाडसामुळेच गोरख यांचा जीव वाचला आहे. त्यामुळे संपूर्ण गावात त्यांचे कौतुक होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
विवेक अग्निहोत्रींचे आणि वरूण धवनचे आहे खास कनेक्शन, काश्मिर फाईल्सच्या दिग्दर्शकानेच केला खुलासा
RRR चे डायरेक्टर एस एस राजामौलींवर संतापली आलिया भट्ट? डिलीट केल्या चित्रपटाशी संबंधित पोस्ट
आलिया-रणबीरने गुपचूप आवरले लग्न, थाटामाटात नाही तर साधेपणाने पार पाडला विवाह सोहळा? फोटो व्हायरल