ट्रेनमधून(Train) प्रवास करत असताना लोक खूप जास्त घाई करतात. यामुळे अनेकदा लोकांचे ट्रेनमधून उतरताना अथवा ट्रेनमध्ये चढताना अपघात होतात. काही वेळा या अपघातात लोकांना जीव देखील गमवावा लागतो. पण तरीही लोक आपल्या जीवाची पर्वा न करता चालत्या रेल्वेतून खाली उतरण्याचा किंवा चढण्याचा प्रयत्न करतात.(women life saved by RPF soldier in gondiya railway station)
अशाच प्रकारची एक घटना महाराष्ट्रातील(Mahrashtra) गोंदिया जिल्ह्यात घडली आहे. काल प्रजासत्ताक दिनी गोंदिया रेल्वे स्थानकावर (Gondia Railway Station) आरपीएफ अधिकाऱ्याने (RPF Officer) एका महिलेचा जीव वाचवला आहे. ही संपूर्ण घटना गोंदिया रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
काल सकाळी गोंदिया रेल्वे स्थानकावरील प्लॅटफोर्म क्रमांक तीनवर ११ वाजून ३ मिनिटांनी गोंडवाना एक्सप्रेस आली होती व ती एक्सप्रेस ११ वाजून ५ मिनिटांनी निघाली. त्यावेळी एक महिला चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. ती महिला गोंडवाना एक्सप्रेस ट्रेनच्या A2 बोगीत चढण्याचा प्रयत्न करत होती. ट्रेनमध्ये चढत असताना अचानक त्या महिलेचा तोल मागच्या बाजूला गेला.
तोल गेल्यामुळे ती महिला चालत्या ट्रेनमधून पडत असल्याचे रोशन कुंबरे या आरपीएफ जवानाने पाहिले. रोशन कुंबरे त्यावेळी गोंदिया रेल्वे स्थानकावर ड्युटी करत होते. त्यांनी लगेचच ट्रेनमधून पडत असणाऱ्या महिलेच्या मदतीसाठी धाव घेतली. आरपीएफ जवान रोशन कुंबरे यांनी त्या महिलेला ट्रेनमध्ये ढकलले. यामुळे त्या महिलेचे प्राण वाचले.
https://twitter.com/rpfsecr1/status/1486537588408139778?s=20
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरपीएफ जवान रोशन कुंबरे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्या महिलेचे प्राण वाचले. या घटनेनंतर आरपीएफ जवान रोशन कुंबरे यांचे कौतुक केले जात आहे. काही दिवसांपूर्वी असाच काहीसा प्रकार मुंबईतील दादर रेल्वेस्थानकात घडला होता.
लोकल ट्रेनमध्ये चढत असताना एका व्यक्तीचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या नादात ही घटना घडली होती. सुदैवाने तेथे उपस्थित असलेल्या तिकीट तपासणीस नागेंद्र मिश्रा यांनी त्या व्यक्तीला बाजूला खेचले. नागेंद्र मिश्रा यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि त्या प्रवाशाचे प्राण वाचले.
महत्वाच्या बातम्या :-
पंतप्रधान किसान योजना: जिवंत शेतकऱ्याला मृत घोषित केले, कार्यालयात गेल्यावर झाला वेगळाच खुलासा
नितेश राणेंना सर्वोच्च न्यायालायाचा दणका, दहा दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्याचे निर्देश
साऊथ मेगास्टार चिरंजीवी यांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती