Share

बाईंना सलाम! होमवर्क केला नाही म्हणून चिमुकल्या विद्यार्थिनीला दिली ‘गोड शिक्षा’, व्हिडिओ तूफान व्हायरल

school

होमवर्क (homework) पूर्ण केला नसेल तर अनेकदा शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा देतात. तुम्हीही शाळेत असताना हा अनुभव घेतला असेलच. अभ्यास केला नसेल तर शिक्षक काठीने फटके देतात, वर्गाच्या बाहेर उभे करतात किंवा पालकांना शाळेत बोलावून घेतात.असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. (woman teacher girl student conversation video in school)

या मुलीने होमवर्क पूर्ण केलेला नाहीये, मात्र विशेष बाब म्हणजे या मुलीच्या शिक्षिकेने तिला कोणतीच शिक्षा दिलेली नाहीये. परंतु त्या शिक्षिकेने मुलीशी असा संवाद साधला की, त्या मुलीने अभ्यास पूर्ण केला. चला तर जाणून घेऊया त्या शिक्षिकेने अशी कोणती आयडिया वापरली, थेट मुलीने शांतपणे राहिलेला अभ्यास पूर्ण केला.

कोरोना काळात विषणूचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी सरकारने लॉकडाउनचा निर्णय जाहीर केला होता. यामुळे मुलांच्या आरोग्यासाठी शाळा देखील बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र आता कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्याने काही प्रमाणात शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

अशातच एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतं आहे. व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे एक छोटीशी चिमुकली शाळेत बसली आहे. शिक्षिका तिला होमवर्क का केला नाही म्हणून विचारत आहेत. मात्र टिचर मारणार म्हणून ती मुलगी आधीच घाबरली आहे. टीचर मारतील या भीतीने तिच्या डोळ्यात देखील पानी आलं आहे.

विशेष बाब म्हणजे मुलीने अभ्यास पूर्ण केला नसून सुद्धा या शिक्षिकेने तिला मारणं,ओरडण्याऐवजी प्रेमाने समजावून तिला हसण्याची शिक्षा दिली. शिक्षिकेने तिला अशा पद्धतीने अभ्यासाचं महत्त्व समजावून सांगितलं की, तिची भीती क्षणातच नाहीशी झाली. तसेच मुलीच्या गालात हसूही फुललं.

दरम्यान, आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. सध्या हा व्हिडिओ तूफान व्हायरल झाला आहे. याचबरोबर हा व्हिडीओ पाहून बहुतेकांना शिक्षक असावा तर असा असंच वाटत आहे. ही बातमी वाचून तुम्हाला देखील नक्कीच तुमच्या शाळेतील आठवण आली असेलच.

महत्त्वाच्या बातम्या
करीना आणि काजोलच्या भररस्त्यातच सुरू झाल्या गप्पा; ‘या’ खाजगी मुद्यावर करत होत्या चर्चा
‘पावनखिंड’ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर का नाही झाला रिलीज? खुद्द अभिनेत्यानेच दिले उत्तर
“…म्हणून मी अजूनपर्यंत लग्न केलेले नाही”; ‘बाहुबली’ फेम प्रभासचा मोठा खुलासा
राज्यपालांनी असं निघून जाणे, भाषणावेळी त्यांचा अपमान होणे हे अयोग्य, आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली खंत

इतर ताज्या बातम्या शिक्षण

Join WhatsApp

Join Now