अलीकडे आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात धक्कादायक घटना घडल्याच सतत उघडकीस येत आहेत. बलात्कार, महिलांची छेडछाड, हत्या यांचे प्रमाण अलीकडे राज्यात वाढले आहे. यामुळे सर्वत्रच भीतीचे वातावरण असतानाच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
ही बातमी वाचून तुमच्या देखील अंगावर नक्कीच काटा उभा राहील. बंद हॉटेलमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने महिलेचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मात्र या प्रकरणाचा पोलिस सध्या कसून तपास करत आहेत. वाचा असं नेमकं घडलं काय? ही धक्कादायक घटना उस्मानाबादमधील असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारच्या सुमारास चिखली पाट परिसरात असलेल्या बंद हॉटेलचे दार उघडल्यानंतर महिलेचा मृतदेह आढळून आला.
त्याचं झालं असं, एक महिन्यापूर्वी एका शेतकऱ्याच्या शेतातील रस्त्याकडची जागा भाड्याने घेऊन हे हॉटेल सुरू करण्यात आले होते. हॉटेल अगदी जोरात सुरू होते. मात्र काही दिवसांपासून हॉटेल बंद असल्याचे त्या शेतकऱ्याच्या निदर्शनास आले. त्या शेतकऱ्याने तात्काळ बेंबळी पोलीस ठाण्यात याबद्दल माहिती दिली.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन भेट दिली. धक्कादायक बाब म्हणजे, बंद हॉटेलचे दार उघडल्यानंतर पोलिसांना महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेह पाहून पोलिस देखील चक्रावले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरीय तपासणीसाठी शासकीय आरोग्य केंद्रात महिलेचा मृतदेह पाठवला जाईल.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता व्यंकट देशमुख (४५ वर्षे अंदाजे) असं या मृत महिलेचे नाव आहे. ती हे हॉटेल चालवत असल्याची देखील माहिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे, महिलेसोबत असलेले ३ पुरुष साथीदार फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
RTO : RTO अधिकाऱ्याच्या घरी सापडला खजिना, पगारापेक्षा ३ पट संपत्ती, आकडा वाचून हादराल
Ajeet Pavar: आपण एकत्र काम केलं आहे, मध्ये बोलायचं नाही; अजितदादांनी शंभूराज देसाईंची केली बोलती बंद
Twins : आईच्या डोळ्यांसमोर दोन जुळ्या मुलांनी सोडला जीव, मग प्रशासनाला आली जाग, वाचून हादराल
शिवसेनेची गळती सुरूच, नागपूरातून मोठा धक्का देत ‘हा’ बडा नेता शिंदे गटाच्या वाटेवर