लाचलुचपत प्रतिबंधक विभाग(ACB): गेल्या काही दिवसात अनेक लाचखोरीची प्रकरणे घडत आहेत. कोल्हापूर येथील घटनेमुळे यात अजून भर झालेली आहे. कोल्हापूर येथील आरोग्य उपसंचालक भावना सुरेश चौधरी ऑफिसमध्ये नटून थटून आलेल्या होत्या. कारण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि रक्षाबंधनाचा पवित्र सण हे दोन्ही कार्यक्रम काल साजरे करायचे होते. अशातच त्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडल्याचा प्रकार गुरुवारी घडला. ऑफिसमध्ये एकीकडे अमृतमहोत्सवाचा कार्यक्रम सुरू असतानाच आरोग्य उपसंचालक लाच घेत होत्या.
लाचेची रक्कम स्वीकारताना गुरुवारी रंगेहात त्यांना अधिकाऱ्यांनी पकडलं. रक्षाबंधनाच्या पवित्र सणाला भावाच्या हातात राखी बांधण्याऐवजी त्यांनी स्वतःच्या हातात बेड्या घालून घेतल्याने सर्वत्र खळबळ उडाली. तक्रारदाराने भविष्य निर्वाह निधीच्या कामासाठी आरोग्य उपसंचालक यांच्याशी संपर्क साधला होता. तक्रारदारास मिळणाऱ्या ९० टक्के रकमेतील ६ लाख ७२ हजार रुपये मंजूर करण्यासाठी १० हजार रुपये लाचेची मागणी आरोग्य उपसंचालकाने केली होती. त्यांनतर ५ हजार रुपये देण्याचे ठरले होते.
एकीकडे अमृत महोत्सवाचा कार्यक्रम सुरू असताना दुसऱ्या बाजूला त्यांनी हे काम मंजूर करण्यासाठी तक्रारदाराला कार्यालयात बोलवून घेतले होते. यावेळी 5 हजार रुपयांची लाच घेताना त्या लाचलुचपत विभागाच्या ताब्यात सापडल्या. ऑफिसमध्ये कार्यक्रम असल्याने त्या नटून थटून आल्या, पण कारवाई झाल्यानंतर आरोग्य उपसंचालक भावना सुरेश चौधरी यांच्यावर चक्क तोंड लपवण्याची वेळ आली होती.
तक्रारदाराने कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यावर सापळा रचून भावना चौधरी या लाचेची रक्कम घेत असताना रंगेहात सापडल्या. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनंतर लाचेची मागणी खरी आहे का? याची पडताळणी केली. त्यांनतर भावना चौधरी यांनी लाच मागितल्याचे सिद्ध झाले होते. तक्रारदार हे पुढील वर्षी सेवानिवृत्त होणार असल्याने रक्कम मंजुरीसाठी प्रक्रिया सुरु केली होती.
भावना चौधरी यांच्या अखत्यारित कोल्हापूरसह सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा कार्यभार आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, संदीप पडवळ, मयूर देसाई, पोलीस शरद पोरे, रूपेश माने, छाया पाटोळे यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
Pankaja Munde : ‘विरोधी पक्षातील नेत्यांना फोडण्यात माझाच हात’, पंकजा मुडेंच्या कबूलीने राजकारणात खळबळ
BJP : सध्याच्या घडीला लोकसभा निवडणूका झाल्यास भाजपचा पराभव नक्की; धक्कादायक आकडेवारी आली समोर
राजू श्रीवास्तवांच्या प्रकृतीबाबत धक्कादायक माहिती आली समोर; भाऊ म्हणाला, डॉक्टर…
रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांचे केले तोंडूभरुन कौतूक, म्हणाले, फडणवीस साहेबांची….