Share

पुण्यात नामांकित कंपनीच्या महिला मॅनेजरवर कारमध्ये बलात्कार, आणि नंतर…

raped

राज्यात दिवसेंदिवस बलात्कारच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे. यामुळे राज्यात महिला सुरक्षित आहेत का? असा गंभीर सवाल उपस्थित होतं आहे. असाच एक धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फसणारी घटना पिंपरी परिसरात घडल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Woman manager rape in car)

पिंपरी-चिंचवडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून ३० वर्षीय तरुणीवर कारमध्ये बलात्कार केल्याचं उघड झाले आहे. एका नामांकित ई- कॉमर्स कंपनीत मॅनेजर पदावर काम करणाऱ्या उच्चशिक्षित महिलेवर कारमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील पिंपरी (Pimpri) परिसरात उघडकीस आली आहे.

या प्रकरणी पीडित महिलेनं वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी शुक्ला यांची ओळख एका मेट्रिमोनिअल साइटवर झाली होती. आरोपीनं ‘सेन्ट्रल मिनिस्ट्री ऑफ अॅग्रीकल्चर फार्मर वेलफेअर’ येथे डायरेक्टर म्हणून कार्यरत असल्याचं सांगितलं होतं. तसेच आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवून पीडितेचा विश्वास संपादन केला होता.

या प्रकरणी आश्विकला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. त्याने आणखी महिला आणि तरुणीना फसवलं असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय पीडित तरुणीला विवाह करायचा असल्याने लग्न जुळवण्याच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केले होते. यावरच आरोपी आश्विकने रिक्वेस्ट पाठवली होती.

त्यानंतर ते दोघे तीन दिवसांनी पिंपळे सौदागर परिसरात भेटले, असं तक्रारीत म्हटलं आहे. त्यांच्यात ओळख वाढत गेली. दोघे ही दररोज व्हॉटसऍप चॅटिंग करत आणि एकमेकांसोबत कार मधून फिरायचे. आरोपी आश्विकने “तू मला आवडतेस आपण लग्न करू” अस पीडितेला सांगितलं.

ही बाब, पीडित तरुणीने घरच्यांना सांगितली. त्यानंतर पीडित तरुणी आणि आरोपी हे एकमेकांना जास्त भेटायला लागले. दरम्यान, आश्विकने पीडितेसोबत जवळीक करण्याचा प्रयत्न करत शारीरिक संबंध ठेवण्यास बळजबरी केली. पण, आपण अगोदर लग्न करू मगच शारीरिक संबंध ठेवू यावर तरुणी ठाम होती. तिने तसं आरोपीला सांगितलं आणि संबंध ठेवण्यास नकार दिला.

दरम्यान आरोपीनं पीडित महिलेला रहाटणी तसेच वाकड परिसरात घेऊन जात तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत. एवढंच नव्हे तर आरोपीनं एका जीपमध्ये पीडितेवर लैंगिक अत्याचार केले आहेत. यानंतर विकृतीचा कळस गाठत आरोपीनं पीडितेला वाकडमधील एका हॉटेलच्या पाठीमागे घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
डोंबिवली: परप्रांतीय रिक्षा चालकाची मुजोरी, रुग्णवाहिकेला बाजू देण्यास दिला नकार; व्हिडिओ व्हायरल
टिम इंडीयाने घडवला इतिहास! तब्बल ३२६ धावांनी मिळवला विजय; विरोधी संघाच्या उडवल्या चिंधड्या
रेड लेटेक्स ड्रेसमध्ये खुपच बोल्ड अवतारात दिसली दीपिका; फोटो पाहून रणवीरचाही सुटला ताबा, म्हणाला…
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम गायक रोहित राऊत अडकला विवाहबंधनात; पहा लग्नसोहळ्यातील खास फोटो

इतर क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now