तामिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. एका महिलेने आपल्या पतीची धारदार हत्यारांनी हत्या केली आहे. मात्र आरोप पत्नीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या नाही. नेमक काय आहे यामागचे कारण हे आपण जाणून घेणार आहोत. पत्नीने ते टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण आपण पाहणार आहोत.
ही घटना तामिळनाडूमधील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री घरी आल्यानंतर महिलेचा पती दारूच्या नशेत होता. दारूच्या नशेत त्याने आपल्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. यानंतर महिलेनं पतीला रोखण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर त्याने पत्नीवर हल्ला केला.
हाती आलेल्या माहितीनुसार, महिलेनं स्वत:ला आणि मुलीला वाचवण्यासाठी पतीवर हातोड्यानं वार करुन मारलं. यानंतर घडलेली घटना शेजाऱ्यांच्या कानी पडली. शेजारांनी घडलेली सर्व हकीकत पोलिसांना सांगितली. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याने पोलिसांनी या महिलेला आणि तिच्या मुलीला अटक केली. दोघींकडेही चौकशी केल्यानंतर या महिलेने पतीची हत्या स्वत:चा आणि मुलीचा जीव वाचवण्यासाठी केल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.
सुरुवातीला या प्रकरणी कलम (302) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर त्याचे आयपीसी कलम 100 मध्ये रूपांतर करण्यात आले. त्यानंतर महिलेची सुटका करण्यात आली. या महिलेला पुन्हा अटक होणार नसल्याचं पोलिसांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले आहे.
परंतु, खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर अचानक पोलिसांनी महिलेची सुटका का केली, असा सवाल तुम्हालाही पडला असेलच. तर जाणून घेऊ या आरोपी महिलेची पोलिसांनी का सुटका केली. 41 वर्षीय महिलेला भारतीय दंड संहितेच्या कलम 100 अंतर्गत सोडण्यात आलं आहे. या अंतर्गत एखाद्या व्यक्तीला हा अधिकार आहे की तो धोक्याच्या प्रसंगी स्वतःचा बचाव करू शकेल.
महत्त्वाच्या बातम्या
जितेंद्र आव्हाड यांचं मुलांच्या जातीवरील ट्वीट चर्चेत; “बापाची जात बंधनकारक का? आई हा…”
वजन कमी करण्यासाठी तरुणाने केली हद्द पार; केले असे काही कृत्य की जीव आला धोक्यात
“उद्धव ठाकरेंनी मद्यक्रांती घडवलीय, त्यांना घेऊन ‘क्रांतिवीर’ पार्ट-२ काढता येईल”
प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी पोटच्याच मुलीला जंगलात सोडले; आईच्या नावाला काळीमा फासणारी घटना